मुंबईतील कॉन्सर्टवेळी 'मिस्ट्री मॅन'सोबत दिसली मलायका अरोरा, नेटकरी म्हणाले, "अर्जुनपेक्षा भारी..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2025 15:41 IST2025-11-02T15:41:21+5:302025-11-02T15:41:56+5:30
मलायका अरोरा पुन्हा प्रेमात?

मुंबईतील कॉन्सर्टवेळी 'मिस्ट्री मॅन'सोबत दिसली मलायका अरोरा, नेटकरी म्हणाले, "अर्जुनपेक्षा भारी..."
बॉलिवूडची हॉट अँड बोल्ड अभिनेत्री मलायका अरोरा अनेकदा तिच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत असते. काही वर्षांपूर्वीच तिचा अरबाज खानसोबत घटस्फोट झाला. नंतर ती १२ वर्ष लहान अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत होती. दोघंही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. सुरुवातीला त्यांन ट्रोल केलं जायचं पण दोघं त्यांच्या नात्यावर ठाम होते. मात्र गेल्या वर्षी मलायका आणि अर्जुनचं नातं तुटलं. सर्वांना धक्का बसला. तर आता मलायका नुकतीच एका मिस्ट्री मॅनसोबत दिसल्याची चर्चा आहे.
मलायका काही दिवसांपूर्वी हॉलिवूड गायक एनरिक्यू इगलिसिसच्या कॉन्सर्टला पोहोचली होती. अनेक सेलिब्रिटी या कॉन्सर्टला आले होते. सर्वांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. एका व्हिडीओत मलायका एका मिस्ट्री मॅनसोबत कॉन्सर्ट एन्जॉय करताना दिसली. ती त्याच्यासोबत हसत होती, नाचत होती, गात होती. यावरुन तो नक्कीच कोणी खास असल्याचा अंदाज नेटकऱ्यांनी लावला. यावरुन मलायकाच्या आयुष्यात नवं प्रेम आल्याची चर्चा सुरु झाली आहे.
एकाने लिहिले, 'अखेर मलायकाने स्टँडर्ड वाढवला' तर दुसरा म्हणतो, 'अर्जुन आणि अरबाजपेक्षा तर खूपच चांगला दिसतोय'. मलायकाने काही दिवसांपूर्वीच ५० वा वाढदिवस साजरा केला. तिचं खरं वय काय यावरूनही खूप चर्चा झाली. कारण मलायका दोन वर्षांपूर्वीच ५० ची झाली होती आणि आता ती ५२ ची असेल असं अनेकांना वाटलं होतं. यावरूनही मलायकाला ट्रोल केलं गेलं. मलायका नुकतीच 'थामा' या सिनेमात आयटम साँग करताना दिसली.