मलायका अरोराने अर्जुन कपूरसोबत ब्रेकअपवर केलं भाष्य, आयुष्यातील बदलांविषयी म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2024 17:13 IST2024-10-17T17:13:08+5:302024-10-17T17:13:55+5:30
सध्या एकंदरच आयुष्याविषयी मलायका अरोरा म्हणाली...

मलायका अरोराने अर्जुन कपूरसोबत ब्रेकअपवर केलं भाष्य, आयुष्यातील बदलांविषयी म्हणाली...
अर्जुन कपूर (Arjun Kapoor) आणि मलायका अरोरा (Malaika Arora) बी टाऊनमधलं सर्वात चर्चेतलं कपल होतं. मलायका अर्जुनपेक्षा १२ वर्षांनी मोठी आहे. तरी त्यांची जोडी कमालीची दिसत होती. मात्र दोघांच्या ब्रेकअपची बातमी आली आणि सर्वांना धक्काच बसला. त्यातच काही दिवसांपूर्वी मलायकाच्या सावत्र वडिलांचं निधन झालं. तेव्हा अर्जुन तिच्यासाठी हजर होता. आता नुकतंच मलायकाने ब्रेकअपचा पश्चात्ताप होत नसल्याचं भाष्य केलं.
ग्लोबल स्पा मॅगजीनसोबत चर्चा करताना मलायका अरोरा म्हणाली, "मला वाटतं मी जे काही निर्णय घेतलेत मग ते प्रोफेशनल आयुष्यातले असो किंवा वैयक्तिक त्या निर्णयांनी माझ्या आयुष्याला एकप्रकारे आकारच दिला आहे. मला कशाचाही पश्चात्ताप नाही. मी स्वत:ला खूप नशिबवान समजते की ज्याप्रकारे गोष्टी समोर आल्या तशाच त्या झाल्या. काही गोष्टी संपवल्या. मी घेतलेल्या निर्णयांचा मला गर्व आहे ."
मलायकाचा रोख अर्जुन कपूरकडेच असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे. याशिवाय ती पुढे म्हणाली, "आयुष्य खूप हेक्टिक आहे आणि काम तर तुम्हाला करणंच आहे. माझ्यासाठी अशा प्रकारची जीवनशैली मेन्टेन करणं खूप गरजेचं आहे जेणेकरुन मी या गेम मध्ये टॉप वर टिकून राहीन. मी माझं डेली रुटीन फॉलो करते. लवकर उठून वर्कआऊट करणं असो किंवा मग डाएट असो."