‘रईस’चे प्रमोशन माहिरा खान करणार ; पण ‘स्काईप’ वरून?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2017 12:49 IST2017-01-11T12:46:13+5:302017-01-11T12:49:32+5:30

‘ऐ दिल हैं मुश्किल’ नंतर ‘रईस’ चित्रपट पाकिस्तानी कलाकारांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलाय. विविध संघटनांकडून होत असलेला विरोध पाहता ‘ऐ ...

Mahira Khan promoting 'Rais'; But from 'Skype'? | ‘रईस’चे प्रमोशन माहिरा खान करणार ; पण ‘स्काईप’ वरून?

‘रईस’चे प्रमोशन माहिरा खान करणार ; पण ‘स्काईप’ वरून?

दिल हैं मुश्किल’ नंतर ‘रईस’ चित्रपट पाकिस्तानी कलाकारांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलाय. विविध संघटनांकडून होत असलेला विरोध पाहता ‘ऐ दिल हैं मुश्किल’ मधील पाकिस्तानी कलाकार फवाद खान याची भूमिकाही चित्रपटातून वगळण्यात आली होती. आता शाहरूख खान आणि माहिरा खान यांच्या मुख्य भूमिकेतील ‘रईस’ चित्रपट प्रमोशनसाठी सज्ज झाला आहे. पण, पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा ही भारतात चित्रपटाचे प्रमोशन करू शकणार नाही. म्हणून चित्रपटाच्या टीमने आता युक्ती शोधून काढली आहे. ती शाहरूख खान आणि टीमसोबत प्रमोशनसाठी जाऊ शकणार नाही पण नक्कीच ‘स्काईप’वरून ती तिच्या चाहत्यांना भेटू शकणार आहे. 

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,‘अभिनेता शाहरूख खान आणि रितेश सिधवानी हे मनसे संघटनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना एक महिन्यापूर्वी भेटायला गेले होते. माहिरा खानला चित्रपटाचे प्रमोशन करता यावे म्हणून राज ठाकरेंची खुप समजूत काढली. मात्र, राज ठाकरे त्यांच्या निर्णयावरून ढळले नाहीत. शेवटी भारतात ती चित्रपटाचे प्रमोशन करू शकणार नाही असे ठरले.’ चित्रपटातील गाणे ‘ओ जालिमा’ लाँच झाल्यानंतर माहिरा खानने सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांना आभाराचे टिवट केले. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जशीजशी जवळ येते आहे तसे ती मोठ्या प्रमाणात प्रमोशन करताना दिसतेय. 

राहुल ढोलकिया दिग्दर्शित ‘रईस’ चित्रपटात शाहरूख खानने गुजरातमधील प्रसिद्ध डॉन अब्दुल लतिफ याची व्यक्तीरेखा साकारली आहे. माहिरा खान हिने त्याच्या पत्नीची भूमिका केली आहे. २६ जानेवारीला चित्रपट रिलीज होणार असून हृतिक रोशनच्या ‘काबील’ चित्रपटासोबत ‘रईस’ चे बॉक्स आॅफिस क्लॅशेस होणार आहेत. पाहूयात, हृतिक रोशन आणि शाहरूख खान यांच्यामधून बॉक्स आॅफिसवर कोण जिंकतेय ते!

Web Title: Mahira Khan promoting 'Rais'; But from 'Skype'?