"मला संकोच वाटला होता...", विनोद खन्नांसोबत इंटिमेट सीनवर माधुरी दीक्षितने आता दिली प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 11:15 IST2025-12-17T11:15:19+5:302025-12-17T11:15:44+5:30
मी त्या सीननंतर ठरवलं की..., माधुरी दीक्षित काय म्हणाली?

"मला संकोच वाटला होता...", विनोद खन्नांसोबत इंटिमेट सीनवर माधुरी दीक्षितने आता दिली प्रतिक्रिया
बॉलिवूडची 'धकधक गर्ल' माधुरी दीक्षितने ८०-९० च्या दशकात सुपरहिट सिनेमे केले. 'तेजाब', 'बेटा', 'खलनायक', 'दिल','साजन' अशा एकापेक्षा एक सिनेमांची यादी आहे. गोड हास्य, सुंदर चेहरा, दमदार नृत्य कौशल्य आणि उत्कृष्ट अभिनय यामुळे माधुरी यशाच्या शिखरावर पोहोचली होती. मात्र एका सिनेमातील इंटिमेट सीनमुळे ती प्रचंड ट्रोल झाली होती. आजही तिला त्या सीनमुळे ट्रोल केलं जातं. तो सीन म्हणजे 'दयावान' सिनेमातला विनोद खन्नासोबतचा किसींग सीन. त्यावर आता माधुरी काय म्हणाली वाचा.
रेडिओ नशाला दिलेल्या मुलाखतीत माधुरी दीक्षितला 'दयावान'सिनेमातील गाण्याबद्दल आणि विनोद खन्नांसोबतच्या इंटिमेट सीनबद्दल विचारण्यात आलं. यावर ती म्हणाली, "मला वाटतं ती एक ग्रोइंग प्रोसेस होती. लर्निंग प्रोसेस होती. आपण जसं जसं काम करत जातो तसं तसं शिकत जातो. सिनेमातला तो सीन केल्यानंतर मलाही थोडा संकोच वाटला होता. तेव्हाच मी ठरवलं की यापुढे असं काहीही करणार नाही."
१९८८ साली 'दयावान' हा सिनेमा आला होता. त्यातलं 'आज फिर तुम पे प्यार आया है' गाणं गाजलं होतं. त्याच गाण्यात माधुरी आणि विनोद खन्नांचा इंटिमेट सीन होता. या सीनबद्दल याआधीही अनेकदा चर्चा झाली होती. विनोद खन्ना सीन करताना अक्षरश: बेभान झाले होते. कट म्हटल्यानंतरही ते माधुरीला किस करत राहिले. यामुळे माधुरीलाही खूप अवघडल्यासारखं वाटलं होतं. तरी नंतर तिने यावर काहीही बोलणं टाळलं होतं.
माधुरी दीक्षित 'मिसेस देशपांडे' सीरिजमध्ये दिसणार आहे. ही क्राइम, थ्रिलर सीरिज आहे. माधुरी यामध्ये पहिल्यांदाच सीरियल किलरची भूमिका साकारत आहे. मराठी अभिनेता सिद्धार्थ चांदेकरचीही सीरिजमध्ये महत्वाची भूमिका आहे.