क्रिती सेननने बॉयफ्रेंडसोबत साजरा केला वाढदिवस? धोनीसोबत आहे कनेक्शन; Photo व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2024 16:42 IST2024-07-29T16:41:09+5:302024-07-29T16:42:32+5:30
कोण आहे क्रितीचा बॉयफ्रेंड?

क्रिती सेननने बॉयफ्रेंडसोबत साजरा केला वाढदिवस? धोनीसोबत आहे कनेक्शन; Photo व्हायरल
अभिनेत्री क्रिती सेननने (Kriti Sanon) दोन दिवसांपूर्वी आपला ३४ वा वाढदिवस साजरा केला. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या क्रितीने गेल्या काही वर्षात आपल्या अभिनयामुळे प्रेक्षकांवर भुरळ पाडली आहे. 'बरेली की बर्फी','मिमी' या सिनेमांमुळे तिने चाहत्यांवर छाप पाडली. दरम्यान क्रितीचं वैयक्तिक आयुष्यही चर्चेत आहे. ती एका बिझनेसमनला डेट करत असल्याच्या गेल्या काही दिवसांपासून चर्चा होत्या. आता नुकतंच तिने आपला वाढदिवस बॉयफ्रेंडसोबत आयर्लंडमध्ये साजरा केल्याचं समोर आलं आहे.
क्रिती सेनच्या वाढदिवसाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. क्रिती इंग्लंडमध्ये राहणाऱ्या बिझनेसमन कबीर बहियासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा आहे. काही महिन्यांपूर्वी क्रिती आणि कबीरचा लंडनमधील फोटो व्हायरल झाला होता. आता आयर्लंडमध्ये त्यांच्या डेटचा फोटो व्हायरल होत आहे. क्रिती आइसलँडमध्ये असून तिथेच तिने बॉयफ्रेंडसोबत बर्थडे साजरा केला. या व्हायरल फोटोमध्ये क्रितीने केशरी रंहाचा ब्रालेट आणि शॉर्ट्स घातली आहे. यावर तिने लांब श्रग घातलं आहे. यात ती कमालीची सुंदर दिसत आहे.
त्याच ठिकाणाहून आणखी फोटो समोर आला आहे. कबीरने इन्स्टाग्रामवर त्याच ठिकाणचा एक सुंदर फोटो शेअर केला. या फोटोनंतरच क्रितीही त्याचठिकाणी होती हे कन्फर्म झालं. अद्याप दोघांनी आपल्या डेटिंगच्या चर्चांना दुजोरा दिलेला नाही.
कबीर बहियाची भारतीय क्रिकेट खेळाडूंशी ओळख आहे. कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीसोबत त्याचे कौटुंबिक संबंध आहेत. शिवाय हार्दिक नताशाच्या लग्नातही कबीरने हजेरी लावली होती.