'या' प्रसिद्ध अभिनेत्याच्या बॅगमध्ये असतात सॅनेटरी पॅड्स; पहिल्यांदाच केलं याविषयी भाष्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2024 11:06 IST2024-03-24T11:05:46+5:302024-03-24T11:06:29+5:30
Bollywood actor: या अभिनेत्याच्या पत्नीने त्याच्या सवयीविषयी जाहीरपणे भाष्य केलं आहे.

'या' प्रसिद्ध अभिनेत्याच्या बॅगमध्ये असतात सॅनेटरी पॅड्स; पहिल्यांदाच केलं याविषयी भाष्य
लोकप्रिय अभिनेता पुलकित सम्राट (Pulkit Samrat) याने नुकतीच अभिनेत्री क्रिती खरबंदा (Kriti Kharbanda) हिच्यासोबत लग्नगाठ बांधली आहे. १५ मार्च रोजी दिल्ली-एनसीआरमध्ये या जोडीने साताजन्माची गाठ बांधली. त्यामुळे सध्या तो चर्चेत आहे. अलिकडेच क्रिती आणि पुलकितने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये पुलकितने त्याच्याविषयी एक खुलासा केला. हा अभिनेता कायम त्याच्या बॅगमध्ये सॅनेटरी पॅड आणि टॅम्पॉन्स ठेवतो, असं तो म्हणाला.
नुकतीच या जोडीने Hutterfly ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने स्त्रियांच्या मासिक पाळीविषयी भाष्य केलं. सोबतच 'तो त्याच्या बॅगमध्ये सॅनेटरी पॅड कायम ठेवतो', असा खुलासाही क्रितीने केला.
माझ्या मासिक पाळीच्या काळात पुलकित माझी खूप काळजी घ्यायचा. पुलकित केवळ माझीच नाही. तर त्याच्या बहिणी, चुलत बहिणी किंवा मैत्रिणींचीही या दिवसात खूप काळजी घेतो. तो कायम त्याच्या बॅगमध्ये सेनेटरी पॅड किंवा टॅम्पॉन्स ठेवतो ज्यामुळे एखाद्या स्त्रिला त्या दिवसांमध्ये गरज पडल्यास मदत करता येऊ शकते, असं क्रितीने सांगितलं.
दरम्यान, पुलकितने क्रितीसोबत दुसरं लग्न केलं आहे. यापूर्वी त्याने २०१४ मध्ये सलमानची मानलेली बहीण श्वेता रोहिरा हिच्यासोबत लग्न केलं होतं. मात्र, त्यांचा संसार फार काळ टिकला नाही.