ब्रेकअपच्या तीन वर्षानंतर पुन्हा एकत्र दिसणार कतरिना-रणबीर, वाचा सविस्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2019 20:00 IST2019-09-16T19:59:36+5:302019-09-16T20:00:27+5:30
रणबीर व कतरिना कैफ शेवटचे जग्गा जासूस चित्रपटात झळकले होते.

ब्रेकअपच्या तीन वर्षानंतर पुन्हा एकत्र दिसणार कतरिना-रणबीर, वाचा सविस्तर
बॉलिवूडची बार्बी गर्ल म्हणजेच कतरिना कैफ नेहमी तिच्या लव लाईफमुळे चर्चेत असते. एक वेळ अशी होती जेव्हा कतरिना कैफरणबीर कपूरला डेट करत होती. मात्र हे नातं जास्त काळ टिकू शकलं नाही. त्या दोघांचं ब्रेकअप झालं. ब्रेकअप नंतरही त्या दोघांच्या चाहत्यांना त्या दोघांना रुपेरी पडद्यावर एकत्र पहायचे आहे.
सूत्रांच्या म्हणण्यानुसार ब्रेकअप झाल्यानंतर रणबीर कपूर व कतरिना कैफला एकमेकांसोबत काम करायचे नव्हते. मात्र आता या दोघांच्या चाहत्यांसाठी खुशखूबर आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार कतरिना कैफ व रणबीर कपूर यांच्या ब्रेकअपला जवळपास तीन वर्षे झाले आहेत आणि आता ते दोघे एकत्र काम करताना दिसणार आहेत. मात्र कोणत्या चित्रपटात नाही तर मोबाईल फोनच्या जाहिरातीत ते दोघे झळकणार आहेत. या जाहिरातीत या दोघांसोबत बादशाहदेखील पहायला मिळणार आहे.
रणबीर व कतरिना कैफ शेवटचे जग्गा जासूस चित्रपटात झळकले होते. या चित्रपटाचं दिग्दर्शन अनुराग बासूने केलं होतं. या चित्रपटातील दोघांचं काम प्रेक्षकांना खूप भावलं होतं. याआधीदेखील ते 'अजब प्रेम की गजब कहानी'मध्ये दिसले होते.
या दोघांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर रणबीर लवकरच ब्रह्मास्त्र चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत आलिया भट, अमिताभ बच्चन, डिंपल कपाडिया, नागार्जुन व मौनी रॉय मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
तर कतरिना कैफ रोहित शेट्टीचा आगामी चित्रपटात सूर्यवंशीमध्ये अक्षय कुमारसोबत दिसणार आहे.