नवऱ्यावर कतरिनाचं जीवापाड प्रेम, दंडावर लिहिलं विकीचं नाव, तुम्ही पाहिलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 14:06 IST2025-04-21T14:02:14+5:302025-04-21T14:06:38+5:30

कतरिना आणि विकी हे कायम चाहत्यांना कपलगोल्स देतात.

Katrina Kaif Writes Vicky Kaushals Name On Arm With Mehendi See Photo | नवऱ्यावर कतरिनाचं जीवापाड प्रेम, दंडावर लिहिलं विकीचं नाव, तुम्ही पाहिलं?

नवऱ्यावर कतरिनाचं जीवापाड प्रेम, दंडावर लिहिलं विकीचं नाव, तुम्ही पाहिलं?

अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) हे बी-टाऊनच्या आवडत्या जोडप्यांपैकी एक आहेत. दोघांची प्रेमकहाणी रोमँटिक चित्रपटापेक्षा कमी नाही. धर्माच्या भिंती तोडून आणि वयातील फरक बाजूला ठेवून कतरिना आणि विकीने २०२१ मध्ये लग्न केलं होतं. या जोडीला बॉलिवूडमधील सिक्रेट कपल म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण या दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल कधीच उघडपणेक काहीही सांगितलं नव्हतं.  दोघे कधीच सार्वजनिक ठिकाणी एकत्र दिसले नाहीत. मात्र, आज हे दोघेजण एकमेकांवरील प्रेम व्यक्त करण्यात कोणतीही कसर सोडत नाहीत. 

नुकतंच विकी आणि कतरिना हे मैत्रिणीच्या लग्नाच्या पार्टीत सहभागी झाले होते. त्यावेळचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ऑफ शोल्डर पिंक गाऊनमध्ये कतरिना अगदी सुंदर दिसत होती. तर विकीनं थ्री पीस सूट परिधान केला होता. यावेळी कतरिनानं अत्यंत खास पद्धतीनं विकीबद्दलच प्रेम व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं. कतरिनानं तिच्या डाव्या हाताच्या दंडावर मेहंदीने 'VK' असं नाव लिहलं. तसंच नावाखाली हार्ट सुद्धा काढलं. कतरिनाचं विकीवर किती प्रेम आहे, हे यातून चाहत्यांना पाहायला मिळालंय.


कतरिना ही फक्त एक चांगली पत्नी नाही, तर एक चांगली सूनदेखील आहे. कतरिनाचं तिच्या सासूसोबत खूप चांगलं बॉन्डिंग आहे. याची झलक अनेकदा दिसून आली आहे. कतरिना कायम तिच्या कुटुंबीयांची काळजी घेताना दिसते. दोघांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर कतरिना ही शेवटची 'मेरी ख्रिसमस' चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात तिनं विजय सेतुपतीसोबत स्क्रीन शेअर केली होती. तर विकी 'छावा' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिनेमातील त्याच्या अभिनयाचं प्रचंड कौतुक तर झालंच, पण यासोबतच 'छावा' हा बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला. याशिवाय, विकी लवकरच 'लव्ह अँड वॉर'मध्ये रणबीर कपूर, आलिया भटसोबत झळकणार आहे. 

Web Title: Katrina Kaif Writes Vicky Kaushals Name On Arm With Mehendi See Photo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.