भाईजानच्या ‘भारत’मधून कॅटरिना कैफ ‘आऊट’! जाणून घ्या काय आहे कारण!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2018 20:06 IST2018-07-10T20:05:04+5:302018-07-10T20:06:49+5:30
सलमान खानच्या ‘भारत’मध्ये प्रियांका चोप्रा, दिशा पाटनी यांच्यासोबतचं कॅटरिना कैफ हिची वर्णी लागल्याची बातमी आम्ही कालचं तुम्हाला दिली होती.

भाईजानच्या ‘भारत’मधून कॅटरिना कैफ ‘आऊट’! जाणून घ्या काय आहे कारण!!
सलमान खानच्या ‘भारत’मध्ये प्रियांका चोप्रा, दिशा पाटनी यांच्यासोबतचं कॅटरिना कैफ हिची वर्णी लागल्याची बातमी आम्ही कालचं तुम्हाला दिली होती. या चित्रपटातकॅटरिना स्पेशल अपीअरन्समध्ये दिसेल, असेही आम्ही तुम्हाला सांगितले होते. कॅट म्हणे या भूमिकेसाठी अजिबात राजी नव्हती. सलमान व सलमानची बहीण अलविरा यांच्या म्हणण्यावरून तिने म्हणे, या चित्रपटाला होकार दिला. पण आता कॅटला मनाविरूद्ध ही भूमिका करण्याची गरज पडणार नाही. होय, कारण या चित्रपटातून कॅटची सुट्टी झाल्याची बातमी आहे.
बॉलिवूडलाईफने दिलेल्या बातमीनुसार, कॅटरिनाची भूमिका या चित्रपटात होती. पण ती असली काय नि नसली काय, तरी प्रेक्षकांवर या भूमिकेचा खास प्रभाव पडणार नव्हता. या भूमिकेशिवायही चित्रपटाची कथा पुढे सरकणार होती. त्यामुळे ‘भारत’च्या निर्मात्यांनी कॅटची भूमिका गाळण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे, यामुळे कॅटरिना किंवा सलमान वा चित्रपटाचा दिग्दर्शक अली अब्बास जफर यापैकी कुणीही नाराज झाले नाही. कारण या सर्वांनी सर्वसहमतीनेचं हा निर्णय घेतला गेला.
आता ‘भारत’मध्ये कॅटरिना नाही म्हटल्यावर तिच्या चाहत्यांची निराशा होणे स्वाभाविक आहे. पण फार निराश होण्याची गरज नाही. कारण सध्या कॅटरिनाकडे ‘झिरो’,‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ असे मोठे चित्रपट आहेत. याशिवाय वरूण धवनसोबत अन्य एका चित्रपटातही ती झळकणार आहे. यात कॅटचा कॅमिओ नाही तर ती मुख्य भूमिकेत आहे.
‘झिरो’मध्ये ती शाहरूख खानसोबत दिसणार आहे तर ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’मध्ये आमिर खानसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. या दोन्ही चित्रपटाचे शूटींग पूर्ण झाले आहे. वरूणसोबतच्या चित्रपटाचे शूटींगही लवकरच सुरू होणार आहे.