सलमान- अलविराने केल्या लाख मिनत्या, तेव्हा कुठे तयार झाली कॅटरिना कैफ!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2018 08:54 PM2018-07-09T20:54:02+5:302018-07-09T20:56:24+5:30

बॉलिवूडचा ‘दबंग’ सलमान खान याच्या ‘भारत’ या आगामी चित्रपटाबद्दल एक रोमांचक बातमी कानावर येतेय. होय, या चित्रपटात कॅटरिना कैफची वर्णी लागलीयं, हीच ती बातमी. 

Katrina kaif signed bharat only for Salman, Alvira | सलमान- अलविराने केल्या लाख मिनत्या, तेव्हा कुठे तयार झाली कॅटरिना कैफ!

सलमान- अलविराने केल्या लाख मिनत्या, तेव्हा कुठे तयार झाली कॅटरिना कैफ!

googlenewsNext

बॉलिवूडचा ‘दबंग’ सलमान खान याच्या ‘भारत’ या आगामी चित्रपटाबद्दल एक रोमांचक बातमी कानावर येतेय. होय, या चित्रपटात कॅटरिना कैफची वर्णी लागलीयं, हीच ती बातमी. खरे तर या चित्रपटासाठी प्रियांका चोप्राला साईन करण्यात आलेय. यासाठी निर्मात्यांनी भलीमोठी रक्कम मोजल्याचीही चर्चा आहे. प्रियांकाशिवाय अभिनेत्री दिशा पाटनी ही सुद्धा या चित्रपटात आहे. केवळ इतकेच नाही तर अभिनेत्री तब्बू ही सुद्धा यात एका महत्त्वपूर्ण भूमिकेत असल्याचे कळतेय. आता तिघी-तिघीजणी असताना चौथी म्हणून कॅटरिनाची एन्ट्री म्हटल्यावर सगळ्यांचेच कान टवकारले. नंतर कळले की, कॅटरिना या चित्रपटात केवळ पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत आहे. म्हणजेच स्पेशअपीअरन्स.

 आता स्पेशल अपीअरन्स म्हटल्यावर साहजिकच प्रियांकाच्या तुलनेत तिची भूमिका अतिशय कमी असणार. सूत्रांचे मानाल तर याच कारणामुळे कॅटरिनाला या भूमिकेत जराही इंटरेस्ट नव्हता. सुरूवातीला तिने या भूमिकेसाठी नकार दिला. पण सलमान आणि सलमानची बहीण अलविरा यांना या भूमिकेसाठी कॅटचं हवी होती. मग काय दोघांनीही कॅटच्या म्हणे, मानमान मिनत्या केल्या, तेव्हा कुठे ती तयार झाली. ताज्या वृत्तानुसार, ‘भारत’मध्ये कॅटरिना प्रियांकाच्या आधी दिसेल. म्हणजे, सुरूवातीला तिची एन्ट्री होईल. सुरूवातीच्या दिवसांत ती व सलमान एकत्र दिसतील. मग कथेत प्रियांका दिसेल.
तुम्हाला ठाऊक असेलच की, हा चित्रपट ‘ओड टू माय फादर’ या कोरियन चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. अभिनेता व निर्माता अतुल अग्निहोत्री (सलमानची बहीण अलविरा खान हिचा पती) दीर्घकाळापासून या चित्रपटाचे प्लानिंग करत होता. यात सलमान 18 वर्षांचा दिसणार आहे. ‘मैने प्यार किया’मध्ये जो सलमान आपण पाहिलात, अगदी तसा सलमान ‘भारत’मध्ये आपल्याला दिसणार आहे.

 

Web Title: Katrina kaif signed bharat only for Salman, Alvira

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.