भाईजानच्या चाहत्यांसाठी खूशखबर! सलमान खान पुन्हा एकदा बनणार ‘टायगर’!! 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2018 09:06 AM2018-07-08T09:06:22+5:302018-07-08T09:08:25+5:30

होय,‘एक था टायगर’ या सुपरडुपर हिट चित्रपटाचा तिसरा भाग येणार आहे आणि या तिस-या भागातही सलमानची वर्णी लागली आहे. सलमानने या चित्रपटासाठी होकार दिल्याचे कळतेय.

salman khan and katrina kaif back with tiger zinda hai new part soon | भाईजानच्या चाहत्यांसाठी खूशखबर! सलमान खान पुन्हा एकदा बनणार ‘टायगर’!! 

भाईजानच्या चाहत्यांसाठी खूशखबर! सलमान खान पुन्हा एकदा बनणार ‘टायगर’!! 

googlenewsNext

‘रेस3’ बॉक्सआॅफिसवर तरल्यानंतर सलमान खानने एका सुपरहिट फ्रेंचाइजीची तयारी केली आहे. होय,‘एक था टायगर’ या सुपरडुपर हिट चित्रपटाचा तिसरा भाग येणार आहे आणि या तिस-या भागातही सलमानची वर्णी लागली आहे. सलमानने या चित्रपटासाठी होकार दिल्याचे कळतेय.
‘एक था टायगर’चा दुसरा पार्ट ‘टायगर जिंदा है’ हा अलीकडेच रिलीज झाला होता. पहिल्या पार्टप्रमाणेच हा दुसरा पार्टही सुपरडुपर हिट ठरला. आता याच्या तिस-या भागातही भाईजानचीच वर्णी लागली आहे. तूर्तास या तिस-या भागाचे नाव काय असेल आणि कथा काय असेल, हे कळले नाही. पण यातही तो भारतीय गुप्तहेराचीच भूमिका साकारणार, हे मात्र पक्के आहे.

तूर्तास सलमान खान ‘भारत’ या चित्रपटात व्यस्त आहे. या चित्रपटानंतर तो ‘दबंग3’मध्ये बिझी होणार आहे. या दोन्ही चित्रपटानंतर सलमान ‘एक था टायगर’च्या फ्रेंचाइजीमध्ये बिझी होईल. या फेंंचाइजीच्या दोन्ही पार्टमध्ये सलमान कॅटरिना कैफसोबत दिसला होता. या जोडीने बॉक्सआॅफिसवर धम्माल केली होती. तिस-या पार्टमध्येही हीच जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करणार असल्याचे कळते.
कॅटरिना व सलमानची जोडी इंडस्ट्रीतील हिट जोडी आहे. ‘टायगर जिंदा है’मधील स्वॅग से करेंगे सबका स्वागत... या कॅटरिना व सलमानवर चित्रीत गाण्याने एक नवा विक्रम रचला होता. हे गाणे प्रचंड लोकप्रीय झाले होते. बॉलिवूडच्या इतिहासात युट्यूबवर 50 कोटी व्ह्युज मिळाले होते.

Web Title: salman khan and katrina kaif back with tiger zinda hai new part soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.