का आलीय कतरिना कैफवर केर काढण्याची वेळ, सेटवर करतेय साफसफाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2020 19:31 IST2020-02-03T19:27:58+5:302020-02-03T19:31:34+5:30
Sooryavanshi Movie : अक्षय कुमारने त्याच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात कतरिना केर काढताना दिसत आहे.

का आलीय कतरिना कैफवर केर काढण्याची वेळ, सेटवर करतेय साफसफाई
कतरिना कैफ सध्या अक्षय कुमारसोबतसूर्यवंशी या चित्रपटाचे चित्रीकरण करत आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच या चित्रपटाची चर्चा सगळीकडे रंगली आहे. या चित्रपटाच्या सेटवरचा एक व्हिडिओ नुकताच अक्षयने शेअर केला असून याच व्हिडिओची सध्या सगळीकडे चर्चा रंगली आहे.
अक्षय कुमारने त्याच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे आणि त्याचसोबत लिहिले आहे की, स्वच्छ भारत अभिनयानाची नवी ब्रँड अॅम्बेसेडर कतरिना कैफ...सूर्यवंशी चित्रपटाच्या सेटवर...
अक्षयने शेअर केलेल्या या व्हिडिओत कतरिनाच्या हातात झाडू दिसत असून ती केर काढताना दिसत आहे. या व्हिडिओत अक्षय तिला तू काय करत आहेस असे विचारत आहे... त्यावर मी साफसफाई करत असल्याचे उत्तर कतरिना देताना आपल्याला दिसत आहे.
अक्षयने शेअर केलेला हा व्हिडिओ अक्षय आणि कतरिनाच्या चाहत्यांना प्रचंड आवडत असून केवळ तीन तासांत 23 लाखाहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट केले असून अनेकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे.
या व्हिडिओत कतरिनाने पांढरा शुभ्र पंजाबी ड्रेस घातला असून केस सोडलेले आहेत. तिच्या आजूबाजूला आपल्याला चित्रपटाच्या सेटवरचे क्रू मेंबर्स पाहायला मिळत आहेत.
‘सुर्यवंशी’ या सिनेमात अक्षय कुमार एटीएफ अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. दहशतवादाविरोधात तो लढताना दिसेल. हा सिनेमा पुढच्या वर्षी 27 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘सिम्बा’प्रमाणेच रोहित शेट्टीचा हा आगामी चित्रपटही एका साऊथच्या सिनेमाचा रिमेक असल्याचे मानले गेले होते. तामिळ भाषेतील ‘सूर्यवंशी’ याचाच हा हिंदी रिमेक असल्याची चर्चा होती. ही बातमी आली आणि अनेकांचा चटकन विश्वास बसला. कारण रोहितने याआधीही अनेक दाक्षिणात्य चित्रपटांचे हिंदी रिमेक बनवले आहेत. पण ही बातमी ऐकताच रोहित प्रचंड संतापला होता.
‘सूर्यवंशी’ कुठल्याही चित्रपटात रिमेक नाही. ही एक ओरिजनल स्टोरी आहे. दीर्घकाळापासून यावर काम सुरू होते, असे त्याने यानंतर स्पष्ट केले होते. या सिनेमात अक्षय कुमारच्या भूमिकेचे नाव वीर सुर्यवंशी असून आहे.