प्रेग्नेंन्सीच्या चर्चेदरम्यान पतीसोबत स्पॉट झाली कतरिना कैफ, लूज टॉपमध्ये लपवत होती बेबी बम्प?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2022 16:18 IST2022-07-15T16:14:33+5:302022-07-15T16:18:49+5:30
Katrina Kaif : काही लोक असेही म्हणत आहेत की आलिया भटप्रमाणेच कतरिना देखील तिच्या प्रेग्नेंसीची घोषणा करण्यासाठी काही खास वेळेची वाट पाहत आहे.

प्रेग्नेंन्सीच्या चर्चेदरम्यान पतीसोबत स्पॉट झाली कतरिना कैफ, लूज टॉपमध्ये लपवत होती बेबी बम्प?
Vicky Katrina Left For Actress Birthday Celebration: आलियाने प्रेग्नेंन्सीची घोषणा केल्यानंतर कतरिना कैफही प्रेग्नेंट असल्याच्या जोरदार चर्चा सुरु झाल्या. प्रेग्रेंन्सीच्या चर्चांनानंतर पहिल्यांदाच कतरिना कैफ स्पॉट झाली आहे. विकी कौशल आणि कतरिना एअरपोर्टवर स्पॉट झालेत. कतरिनाचा बर्थ डे सेलिब्रेट करण्यासाठी दोघे मालदीवला रवाना झालेत. सोशल मीडियावर विकी-कतरिनाचे काही फोटो समोर आले आहेत.
कतरिना कैफचे हे फोटो समोर येताच पुन्हा एकदा तिच्या प्रेग्नेंसीच्या चर्चांना उधाण आले आहे. यावेळी विकी कौशल क्लीन शेव्ह लूकमध्ये दिसला, तर सर्वांच्या नजरा कतरिनाच्या स्वेटशर्टवर खिळल्या होत्या. कतरिना कैफ सध्या लाइमलाइटपासून पूर्णपणे दूर आहे, त्यामुळे तिच्या प्रेग्नेंसीच्या अफवांनी जोर धरला आहे. समोर आलेल्या फोटोंमध्ये कतरिना आणि विकी एकमेकांचा हात हातात धरुन चालताना दिसतायेत. काही लोक असेही म्हणत आहेत की आलिया भटप्रमाणेच कतरिना देखील तिच्या प्रेग्नेंसीची घोषणा करण्यासाठी काही खास वेळेची वाट पाहत आहे.
बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफ उद्या म्हणजेच 16 जुलै रोजी बर्थ डे सेलिब्रेट करणार आहे. यानिमित्ताने विकी कौशलने मालदीवमध्ये खास व्हेकेशन पॅक बुक केला आहे. अभिनेत्रीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच 'फोन बूथ', 'मेरी ख्रिसमस' आणि 'टायगर 3' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. याशिवाय कतरिनाकडे फरहान अख्तरचा 'जी ले जरा' देखील आहे. या चित्रपटात सहकलाकार आलिया भट्ट आणि प्रियांका चोप्रा मुख्य भूमिकेत आहेत.