कतरीना कैफच्या सुंदर केसांचं गुपित काय ? सासूबाई बनवतात खास Hair Oil!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2024 14:15 IST2024-12-22T14:13:51+5:302024-12-22T14:15:47+5:30
कतरिना कैफ आता कौशल कुटुंबाची सून आहे.

कतरीना कैफच्या सुंदर केसांचं गुपित काय ? सासूबाई बनवतात खास Hair Oil!
अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल ही बॉलीवूडमधील लोकप्रिय जोडी आहे. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ मध्ये लग्न केले. राजस्थानमध्ये एका खासगी सोहळ्यात दोघांनी एकत्र राहण्याचे वचन घेत सप्तपदी फिरल्या. लग्नाच्या तीन वर्षांनंतरही दोघांमध्ये कमालीची रोमँटिक केमेस्ट्री दिसून येते. कतरिना आणि तिच्या सासरच्या मंडळीमधील घट्ट नाते अनेकदा दिसून आले आहे. सासू आपल्या लाडक्या सुनेची पूर्ण काळजी घेतात. त्यामुळे कतरिना सुद्धा सासूबाईंच्या प्रेमळ स्वभावाचा वारंवार उल्लेख करते.
कतरिनाच्या सासू तिच्यासाठी एक खास तेल बनवतात. याचा खुलासा स्वत: कतरिना कैफनं नुकत्याच 'द वीक'ला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. कतरिना म्हणाली, "माझी सासूबाई माझ्यासाठी कांदा, आवळा, अॅव्होकाडो आणि त्यात आणखी दोन-तीन गोष्टी टाकून केसांना लावण्यासाठी तेल बनवतात. त्याशिवाय घरगूती उपाय देखील खूप चांगल्या प्रकारे करतात".
स्किनकेयरविषयी कतरिना म्हणाली, "मला स्किनकेयर खूप आवडतं कारण माझी त्वचा ही खूप सेंसेटिव्ह आहे. मला ग्वा-शा ( त्वचेला चांगली ठेवण्यासाठी ग्वा-शा तंत्र वापरलं जातं) खूप आवडतं. मला हे माहित आहे की त्यासाठी खरं तर मी खूप उशिर केला आहे. मी आताच ते करण्याची सुरुवात केली आहे".
वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर अभिनेत्री कतरिना कैफ बऱ्याच काळापासून पडद्यावरुन गायब आहे. 'टायगर ३' या सिनेमात ती शेवटची दिसली. सध्या कतरिना संसारात रमली आहे. नुकतंच तिनं सासूसोबत शिर्डीच्या साईबाबांचं दर्शन घेतलं. त्यांच्या दर्शनाचा व्हिडिओ व्हायरल होतोय.