एअरपोर्टवर सलमान खानसोबत नाही दिसली कॅटरिना कैफ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2017 15:52 IST2017-07-28T10:08:18+5:302017-07-28T15:52:55+5:30

सलमान खान टायगर जिंदा है ची शूटिंग पूर्ण करुन मोरक्कोवरुन भारतात परतला आहे. काल रात्री उशीरा तो मुंबई एअरपोर्टवर ...

Katrina Kaif not seen with Salman Khan at airport | एअरपोर्टवर सलमान खानसोबत नाही दिसली कॅटरिना कैफ

एअरपोर्टवर सलमान खानसोबत नाही दिसली कॅटरिना कैफ

मान खान टायगर जिंदा है ची शूटिंग पूर्ण करुन मोरक्कोवरुन भारतात परतला आहे. काल रात्री उशीरा तो मुंबई एअरपोर्टवर लँड झाला. मात्र यावेळी सलमान सोबत कॅटरिना कैफ मात्र दिसली नाही.सलमानचे शेड्यूल जूनपासून व्यस्त आहे. अबु धाबीमध्ये 'टायगर जिंदा है'च्या शूटिंगनंतर तो 'IIFA 2017'मध्ये सहभागी होण्यासाठी न्यूयॉर्कला रवाना झाला होता. न्यूयॉर्कमध्ये सलमान आणि कॅटरिनाचा रोमान्स सगळ्यांनी बघितला होता. कॅटरिना आणि सलमान पुन्हा एकदा एकत्र आल्याची चर्चा ही यानंतर सुरु झाली होती. IIFA पत्रकार परिषदेपासून ते अॅवॉर्ड सोहळ्यापर्यंत सगळीकडे कॅटरिना आणि सलमान एकत्र फिरताना दिसले. IIFAमधून परतल्यानंतर सलमान टायगर जिंदा हैच्या पुढच्या शूटिंगसाठी कॅटरिनासोबत मोरक्कोला गेला होता. मात्र मग असे अचानक काय झाले की मोरक्कोवरुन परतताना सलमान एकटाच आला. 

ALSO READ :  केवळ १७ महिन्यांत कॅटरिना कैफचे चार चित्रपट होणार रिलीज; वाचा यादी! 

सलमान  बिग बॉस सीजन 11चे सूत्रसंचालन करणार आहे. त्यामुळे तो लगचेच प्रोमो शूटच्या कामाला लागणार आहे. यानंतर सलमान पुन्हा 45 दिवसांसाठी टायगर जिंदा है च्या शूटिंगसाठी अबु धाबीला रवाना होणार आहे. अली अब्बास जफर दिग्दर्शित हा चित्रपट एक था टायगरचा सीक्वल आहे. ब्रेकअपनंतर तब्बल 5 वर्षांनी या चित्रपटात सलमान आणि कॅटरिना एकत्र दिसणार आहेत. त्यामुळे त्यांचे फॅन्स या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत असतील यात काही शंका नाही. 22 डिसेंबरला हा चित्रपट रिलीज होणार आहे. टायगर जिंदा है नंतर सलमान रेमो डिसोझाच्या डान्सवर आधारित चित्रपटाची शूटिंग सुरु करणार आहे. यात त्याच्यासह जॅकलिन फर्नांडिस दिसणार आहे.  

Web Title: Katrina Kaif not seen with Salman Khan at airport