कतरिना कैफचा पुन्हा डीपफेक व्हिडिओ व्हायरल; हृतिक रोशनसोबत दिसली अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2024 13:38 IST2024-01-23T13:34:22+5:302024-01-23T13:38:23+5:30

सोशल मीडियावर सध्या कतरिना कैफचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Katrina Kaif Deepfake Video With Hristhik Roshan goes viral after Rashmika and Alia Bhatt | कतरिना कैफचा पुन्हा डीपफेक व्हिडिओ व्हायरल; हृतिक रोशनसोबत दिसली अभिनेत्री

कतरिना कैफचा पुन्हा डीपफेक व्हिडिओ व्हायरल; हृतिक रोशनसोबत दिसली अभिनेत्री

सध्या डीपफेक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.  रश्मिका मंदान्ना, काजोल, आलिया भट, नोरा फतेही आणि प्रियांका चोप्रा यांच्यासारखी अनेक कलाकार याला बळी पडले आहेत. आता कतरिना कैफचा डीपफेक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये कतरिना कैफसोबत अभिनेता हृतिक रोशन देखील दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

भारतात ज्याप्रकारे डीपफेकची प्रकरणे वाढत आहेत, ही परिस्थिती चिंताजनक आहे. आता व्हायरल झालेल्या कतरिना कैफचा डीपफेक व्हिडीओ एका मुलाखतीचा आहे. ज्यामध्ये कतरिना कैफ अस्खलित तुर्की भाषेत बोलताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये कतरिनासोबत अभिनेता हृतिक रोशनही दिसत आहे.  'बँग बँग' चित्रपटाच्या प्रमोशनाचा हा व्हिडीओ एडिट करण्यात आला आहे. 

कतरिना कैफच्या फॅनपेजवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.  कॅप्शनमध्ये लिहिले की, 'जर तू तुर्की भाषेमध्ये बोलली असती तर ते असे दिसले असते. हा व्हिडीओ आर्टिफिशियल इंटेलिजन्सने तयार केला आहे'. कतरिनाच्या या डीपफेक व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट्स करत हे सर्व धक्कादायक असल्याचं म्हटलं आहे. तर काही चाहत्यांनी यावर तात्काळ बंदी घालण्याची मागणी केली. 

कतरिना कैफ डीपफेकची शिकार होण्याची ही पहिली वेळ नाही. याआधी देखील कतरिना कैफचा एक डीपफेक फोटो व्हायरल झाला होता.  'टायगर 3' या चित्रपटात तिनं एक टॉवेल सीन केला होता. मूळ फोटोत बदल करत डीपफेक फोटोत अभिनेत्री पांढऱ्या बिकिनीत दिसली होती. फोटोशॉप किंवा डीपफेक टूलद्वारे फोटोशी छेडछाड करणे हा दंडनीय गुन्हा आहे. तंत्रज्ञानाच्या निव्वळ गैरवापरामुळे हे घडत असून, त्यावर कठोर कारवाईही केली जात आहे. कतरिना ही बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे त्यामुळे तिच्यासोबत असे होणे ही खूप मोठी गोष्ट आहे.

Web Title: Katrina Kaif Deepfake Video With Hristhik Roshan goes viral after Rashmika and Alia Bhatt