ससुराल गेंदा फूल! कतरिना कैफने मैत्रिणीच्या हळदीला धरला ठेका; नेटकरी म्हणाले, 'परफेक्ट बहू'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 09:59 IST2025-03-06T09:59:01+5:302025-03-06T09:59:54+5:30

कुटुंबासोबत ती या लग्नात पोहोचली होती. तिचा व्हिडिओ आता व्हायरल होतोय.

katrina kaif danced on sasural genda phool song netizens says perfect bahu | ससुराल गेंदा फूल! कतरिना कैफने मैत्रिणीच्या हळदीला धरला ठेका; नेटकरी म्हणाले, 'परफेक्ट बहू'

ससुराल गेंदा फूल! कतरिना कैफने मैत्रिणीच्या हळदीला धरला ठेका; नेटकरी म्हणाले, 'परफेक्ट बहू'

कौशल कुटुंबाची सून अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif)  आता अस्सल भारतीय नारी झाली आहे. कधी सासूसोबत देवदर्शन तर कधी कुटुंबासोबत ती सण साजरे करताना दिसते. आता नुकतंच ती एका लग्नात 'ससुराल गेंदा फूल' गाण्यावर नाचताना दिसली. 'परफेक्ट देसी बहू' वाटावी असा तिचा ऑरा असतो. कुटुंबासोबत ती या लग्नात पोहोचली होती. तिचा व्हिडिओ आता व्हायरल होतोय.

कतरिना कैफ नुकतीच एका मैत्रिणीच्या हळद सेरेमनीला पोहोचली होती. यावेळी ती काही मुलींसोबत मनसोक्त नाचत होती. 'सांस गाली देवे देवरजी समझा लेवे, ससुराल गेंदा फूल' या गाण्यावर तिने ठेका धरला. ग्रे रंगाच्या पंजाबी ड्रेसमध्ये तिने ठुमका लावला. तिचा भारतीय अंदाज सर्वांनाच आवडलाय. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.


काल या हळदीला विकी कौशल, सनी कौशल, शर्वरी वाघ आणि कबीर सिंह हे सेलिब्रिटीही होते. कतरिनाच्या डान्सने चार चाँद लावले. या फंक्शनचे प्री वेडिंग इनसाइड व्हिडिओही व्हायरल झाले आहेत. कतरिना कौशल कुटुंबात एकदम मिसळली आहे. 

कतरिना काही दिवसांपूर्वी सासूसोबत महाकुंभला गेली होती. तिथे तिने गंगास्नान केलं. तसंच त्याआधी शिर्डीला तिने साईबाबांचंही दर्शन घेतलं. कतरिना कैफ शेवटची 'मेरी ख्रिसमस'  सिनेमात दिसली होती. यात तिने विजय सेतुपतिसोबत स्क्रीन शेअर केली होती.

Web Title: katrina kaif danced on sasural genda phool song netizens says perfect bahu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.