Katrina Kaif-Vicky Kaushal Baby: गुडन्यूज! कतरिनाने दिला गोंडस बाळाला जन्म, विकी कौशलचा आनंद गगनात मावेना, म्हणाला...
By कोमल खांबे | Updated: November 7, 2025 11:26 IST2025-11-07T11:24:36+5:302025-11-07T11:26:07+5:30
Vicky Kaushal Katrina Kaif Welcome Baby Boy: विकी कौशल आणि कतरिनाच्या आयुष्यात चिमुकल्याचं आगमन झालं आहे. विकी कौशलने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही गुडन्यूज चाहत्यांना दिली आहे.

Katrina Kaif-Vicky Kaushal Baby: गुडन्यूज! कतरिनाने दिला गोंडस बाळाला जन्म, विकी कौशलचा आनंद गगनात मावेना, म्हणाला...
बॉलिवूडमधून एक गुडन्यूज आली आहे. कतरिना कैफ आणि विकी कौशल आईबाबा झाले आहेत. कतरिनाने त्यांच्या पहिल्या बाळाला जन्म दिला आहे. ७ नोव्हेंबर रोजी विकी कौशल आणि कतरिनाच्या आयुष्यात चिमुकल्याचं आगमन झालं आहे. विकी कौशलने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही गुडन्यूज चाहत्यांना दिली आहे. कतरिना आणि विकीला पुत्ररत्नाची प्राप्ती झाली आहे.
विकीने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलंय की "आमच्या लाडक्या बाळाचं आगमन झालं आहे. प्रेमाने आम्ही आमच्या बेबी बॉयचं स्वागत केलं आहे". विकीच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत. तर सेलिब्रिटींनीही विकी आणि कतरिनाचं अभिनंदन केलं आहे.
काही दिवसांपूर्वीच विकी-कतरिनाने आईबाबा होणार असल्याची गुडन्यूज चाहत्यांबरोबर शेअर केली होती. आता त्यांच्या आयुष्यात चिमुकल्याची दुडुदुडु धावणारी पावलं आली आहेत. विकी कौशल आणि कतरिनाने २०२१ मध्ये लग्नगाठ बांधली होती. आता लग्नानंतर ४ वर्षांनी ते आईबाबा झाले आहेत.