कार्तिक आर्यनचे शिक्षण किती झाले हे तुम्हाला माहितीये का? जाणून घ्या सविस्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2024 16:43 IST2024-11-07T16:41:58+5:302024-11-07T16:43:08+5:30
बॉलिवूडमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या कार्तिकची शैक्षणिक पात्राता तुम्हाला माहित आहे का? याबद्दल आपण जाणून घेऊया.

कार्तिक आर्यनचे शिक्षण किती झाले हे तुम्हाला माहितीये का? जाणून घ्या सविस्तर
Kartik Aaryan education: कार्तिक आर्यन (Kartik Aryan) सध्या बॅक टू बॅक चित्रपट करत आहे. अलिकडच्या काळात तो सर्वाधिक चित्रपट करणारा अभिनेता म्हणून उदयास आला आहे. अभिनेता त्याच्या आगामी 'भूल भुलैया ३' (Bhool Bhulaiya 3) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्याचा हा सिनेमा दणक्यात कमाई करतोय. बॉलिवूडमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या कार्तिकची शैक्षणिक पात्राता तुम्हाला माहित आहे का? याबद्दल आपण जाणून घेऊया.
कार्तिकचा जन्म 22 नोव्हेंबर 1990 रोजी मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे झाला. त्याचे आई-वडील दोघेही डॉक्टर आहेत. त्याचे वडील डॉ. मनीष तिवारी बालरोगतज्ञ आहेत आणि आई डॉ. माला तिवारी या स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत. कार्तिकची बहिणदेखील डॉक्टर आहे. कुटुंबातील इतर व्यक्ती प्रमाणे कार्तिक मात्र डॉक्टर झाला नाही. त्याने वेगळी वाट निवडली.
कार्तिकचे ग्वाल्हेरमध्येच प्राथमिक शिक्षण पुर्ण केलं. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो मुंबईला शिफ्ट झाला. कार्तिकने अभियंता व्हावे अशी त्याच्या आईवडिलांची इच्छा होती. त्यामुळे त्याने इंजिनीअरिंगला प्रवेश घेतला. त्याने डी. वाय. पाटील कॉलेजमधून बायोटेक्नोलॉजीमध्ये बी.टेक पदवी मिळवली. याच दरम्यान त्याच्या मनात हिरो बनण्याची इच्छा निर्माण झाली आणि तो इंजिनीअरिंगचे वर्ग बंक करून चित्रपटांच्या ऑडिशनला जायचा आणि अखेर त्याला 'प्यार का पंचनामा' हा पहिला चित्रपट मिळाला.
कार्तिकने २०११ साली 'प्यार का पंचनामा' मधून एन्ट्री केली. तेव्हापासून आजपर्यंत त्यानं करिअरमध्ये अनेक चढऊतार अनुभवले आणि शेवटी हवं ते मिळवलंच. कधीकाळी मुंबईत रिक्षा, टॅक्सीने फिरणाऱ्या कार्तिककडे आज लॅम्बॉर्गिनी, रेंज रोव्हरसारख्या गाड्या आहेत. कार्तिक आपलं फ्रस्ट्रेशन दूर करण्यासाठी लक्झरी गाड्या खरेदी करतो. आगामी वर्क प्रोजेक्टबद्दल बोलायचं झालं तर 'आशिकी 3' मध्येही त्याची वर्णी लागल्याची चर्चा आहे.