न्यूड फोटो शेअर करणाऱ्या ईशा गुप्ताची केआरकेने केली सनी लिओनीशी तुलना; ईशानेही दिले सडेतोड उत्तर !

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2017 09:24 AM2017-08-13T09:24:40+5:302017-08-13T14:55:58+5:30

सध्या बॉलिवूडची हॉट आणि बोल्ड अभिनेत्री ईशा गुप्ता हिने सोशल मीडियावर अक्षरश: आग लावली आहे. न्यूड फोटो शेअर करून ...

KARK compared the Sunny Leonei to Isha Gupta, who shares the Nude photo; Even the answered reply! | न्यूड फोटो शेअर करणाऱ्या ईशा गुप्ताची केआरकेने केली सनी लिओनीशी तुलना; ईशानेही दिले सडेतोड उत्तर !

न्यूड फोटो शेअर करणाऱ्या ईशा गुप्ताची केआरकेने केली सनी लिओनीशी तुलना; ईशानेही दिले सडेतोड उत्तर !

googlenewsNext
्या बॉलिवूडची हॉट आणि बोल्ड अभिनेत्री ईशा गुप्ता हिने सोशल मीडियावर अक्षरश: आग लावली आहे. न्यूड फोटो शेअर करून ईशाने खळबळ तर उडवलीच, शिवाय तिच्या फोटोंवर टीका करणाºयांनाही तिने मुक्त कंटाने फटकारले. आता या यादीत कॉन्ट्रोर्व्हशियल कॉमेण्ट्ससाठी ओळखल्या जाणाºया केआरके ऊर्फ कमाल आर. खान याच्याही नावाचा समावेश झाला आहे. खरं तर ईशाच्या फोटोवर केआरकेने अद्यापपर्यंत कॉमेण्ट केली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते. परंतु उशिरा का होईना त्याने ईशावर नेहमीच्या शैलीत कॉमेण्ट केली अन् ईशानेही त्याला जसास तसे उत्तर देऊन त्याचे तोंड बंद केले. 

ईशाने गेल्या काही दिवसांपूर्वी तिच्या सोशल अकाउंटवर सेमी-न्यूड फोटोज् शेअर करून खळबळ उडवून दिली होती. ईशाचे हे फोटो बघून केआरकेने एक ट्विट केले. अर्थात हे ट्विट वादग्रस्तच होते. ट्विटमध्ये लिहिले की, ‘डिअर ईशा, तुझे हे फोटो मला आॅटोग्राफसह पाठवू शकतेस काय? त्याबदल्यात मी तुझ्या प्रत्येक चित्रपटाला चार रेटिंग देणार.’ केआरके एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने एकापाठोपाठ एक ट्विट करून ईशावर निशाना साधला. 



केआरकेने त्याच्या पुढच्या ट्विटमध्ये लिहिले की, ‘डार्लिंग ईशा, यू आर रिअली लुकिंग सुपर हॉट’ तसेच आणखी एका ट्विटमध्ये लिहिले की, ‘बेबी ईशा ! तू लवकरच सनी लिओनीला मात देणार आहेत. जस्त सुपर्ब!!’ केआरकेचे हे वादग्रस्त ट्विट मात्र ईशाला चांगले झोंबले. तिनेही केआरकेला सडेतोड उत्तर देत त्याची बोलती बंद करण्याचा प्रयत्न केला. 

ALSO READ : SEE HOT PICS : ईशा गुप्ताच्या या सात फोटोंनी ओलांडल्या बोल्डनेसच्या परिसीमा!!

ईशाने केआरकेच्या ट्विटला उत्तर देताना लिहिले की, ‘नक्की, लवकरच पाठवतेय ! यासाठी तुझे आभार’ अर्थात ईशाचे हे खोचक उत्तर केआरकेला कितपत पचनी पडेल हे सांगणे मुश्किलच म्हणावे लागेल. कारण केआरके अशाप्रकारचे खोचक उत्तर देणारी ईशा ही पहिलीच अभिनेत्री नसून, यापूर्वीही त्याला अनेक अभिनेत्रींनी अशाप्रकारे फटकारले आहे. खरं तर ईशाने हे फोटो शेअर केल्यापासूनच सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. यामुळे तिच्यावर खरपूस टीकाही केली गेली आहे. परंतु ईशानेही टीकाकारांना सडेतोड उत्तर दिले आहे. 

Web Title: KARK compared the Sunny Leonei to Isha Gupta, who shares the Nude photo; Even the answered reply!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.