करिना कपूर-खानच्या ‘या’ फोटोंची सोशल मीडियावर धूम!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2017 20:04 IST2017-12-29T14:25:23+5:302017-12-29T20:04:13+5:30

करिना कपूरने नुकतेच एका मॅगझीनच्या कव्हर पेजसाठी फोटोशूट केले असून, त्यामध्ये तिचा अंदाज घायाळ करणारा आहे. सध्या तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच शेअर केले जात आहेत.

Kareena Kapoor-Khan's 'Photos' Smoke on Social Media !! | करिना कपूर-खानच्या ‘या’ फोटोंची सोशल मीडियावर धूम!!

करिना कपूर-खानच्या ‘या’ फोटोंची सोशल मीडियावर धूम!!

ल्या काही दिवसांपासून करिना कपूर-खान चांगलीच हायलाइट होत आहे. सुरुवातीला मुलगा तैमूरच्या बर्थ डेमुळे, त्यानंतर ख्रिसमस पार्टीत अन् आता एका जबरदस्त फोटोशूटमुळे करिना चर्चेत आली आहे. करिनाचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, त्यास मोठ्या प्रमाणात पसंत केले जात आहे. करिनाने हे फोटो एका मॅगझीनसाठी शूट केले आहेत. वोग इंडिया मॅगझीनच्या कव्हर पेजवर यावेळेस करिना झळकणार आहे. या फोटोमध्ये करिना तीन वेगवेगळ्या ड्रेसमध्ये बघावयास मिळत आहे. त्यामुळेच तिचे हे फोटो घायाळ करणारे ठरत आहेत. 
 

एका फोटोमध्ये करिनाने लॉन्ग गोल्डन शिमरी मॅक्सी घातलेली आहे. दुसºया फोटोत तिने निळ्या रंगाचा शिमरी गाउन घातला आहे, तर तिसºया फोटोमध्ये करिना व्हाइट लेस गोल्डन ड्रेसमध्ये दिसत आहे. करिनाचे हे सर्व फोटो वोगने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. करिना सध्या तिच्या आगामी ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात करिना व्यतिरिक्त सोनम कपूर, स्वरा भास्कर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. करिना आई झाल्यामुळे या चित्रपटाचे शूटिंग बराच काळ थांबले होते. आता करिना आई बनल्यानंतर या चित्रपटातून दमदार कमबॅक करण्यास सज्ज आहे. 
 

काहीकाळापूर्वीच या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहेत. पहिल्या पोस्टरमध्ये करिनाने तिचा चेहरा एका हातपंख्याच्या साहाय्याने झाकलेला दिसत आहे. स्वरा जमिनीवर पडलेली कुठलीतरी वस्तू उचलत असल्याने तिचा चेहरा झाकला गेला आहे, तर शिखा सोनमचा पदर काळजीपूर्वक बघताना दिसत आहे. दुसºया पोस्टरमध्ये सोनम आणि करिना मस्तीच्या मुडमध्ये दिसत आहेत. एकूणच आतापर्यंत रिलीज करण्यात आलेल्या सर्व पोस्टर्सला चाहत्यांकडून पसंती मिळत आहे. 

Web Title: Kareena Kapoor-Khan's 'Photos' Smoke on Social Media !!