​करण जोहरला ‘या’ एका गोष्टीसाठी करायचेय, शाहरूख खानशी लग्न!!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2017 04:17 AM2017-03-19T04:17:19+5:302017-03-19T09:47:19+5:30

करण जोहर अलीकडचे सरोगसीच्या माध्यमातून  यश व रूही अशा दोन जुळ्या मुलांचा बाप झाला. करणने लग्न केलेले नाही, हे ...

Karan Johar wants 'this' for one thing, marrying Shah Rukh Khan! | ​करण जोहरला ‘या’ एका गोष्टीसाठी करायचेय, शाहरूख खानशी लग्न!!

​करण जोहरला ‘या’ एका गोष्टीसाठी करायचेय, शाहरूख खानशी लग्न!!

googlenewsNext
ण जोहर अलीकडचे सरोगसीच्या माध्यमातून  यश व रूही अशा दोन जुळ्या मुलांचा बाप झाला. करणने लग्न केलेले नाही, हे तुम्हाला ठाऊक आहेच. पण करणने लग्न करायचे झाल्यास तो कुणासोबत करेल? या प्रश्नाचे उत्तर जाणून घ्यायला तुम्हीही उत्सूक असाल तर खुद्द करणनेच याचे उत्तर दिलेय. अलीकडे एका मंचावर करण जोहर त्याच्या लग्नाबद्दल विचारण्यात आले. तुला लग्न करायचे झाल्यास, शाहरूख खान, ऐश्वर्या राय आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्यापैकी तू कुणाशी लग्न करशील? असा प्रश्न त्याला विचारण्यात आला. करणने लगेच शाहरूखचे नाव घेतले. होय, मला लग्न करायचे असेल तर मी शाहरूखशी करेल, असे तो म्हणाला. विशेष म्हणजे, शाहरूखच का? याचे उत्तरही त्याने दिले. मला शाहरूखचा बंगला खूप आवडतो, म्हणून ती त्याच्याशीच लग्न करेल, असे करण म्हणाला. अलीकडे करणची बायोग्राफी प्रसिद्ध झाली. करणने यात शाहरूखसोबतच्या त्याच्या रिलेशनबद्दल मनमोकळेपणे लिहिले होते. 

ALSO READ : करण जोहर आपली संपत्ती देणार शाहरुखच्या मुलांना

या मंचावर करण त्याच्या मुलांबद्दलही बोलला. वंश पुढे नेण्यासाठी तू सरोगसीच्या माध्यमातून दोन मुलांना जन्म देण्याचा निर्णय घेतला का? असा सवाल त्याला विचारण्यात आला. यावर करणने नकारार्थी उत्तर दिले. मुलांमुळे माझे आयुष्य पूर्ण झाले आहे. माझ्या आयुष्यात या मुलांचे वेगळे महत्त्व आहे, असे तो म्हणाला.
करण जोहर आणि शाहरुख खान यांची मैत्री अनेक वर्षांपासूनची आहे. ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ या चित्रपटात करण जोहरने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते. त्याने या चित्रपटाच्यावेळी आदित्य चोप्राला असिस्ट केले होते. या चित्रपटात शाहरुख खान प्रमुख भूमिकेत होता. या चित्रपटापासूनच करण आणि शाहरुख खूप चांगले फ्रेंड्स बनले आहेत. त्यानंतर करणने दिग्दर्शित केलेल्या अनेक चित्रपटांमध्ये शाहरुख खान झळकला. तसेच शाहरुख आणि करण अनेक पुरस्कार सोहळ्यात एकत्र पाहायला मिळतात. तसेच एकमेकांच्या घरी कोणती पार्टी असल्यास ते आवर्जून उपस्थित राहतात.केवळ शाहरुखसोबतच नव्हे तर शाहरुखच्या कुटुंबियांसोबतदेखील करणचे खूप चांगले संबंध आहेत. शाहरुख खानची पत्नी गौरी खानदेखील करणची खूपच चांगली मैत्रीण आहे. त्याचसोबत सुहाना, आर्यन आणि अब्राहम या शाहरुखच्या मुलांसोबतही करणची ट्युनिंग खूप चांगली आहे. सुहाना आणि आर्यन या दोघांना तर तो आपल्या मुलांसारखाच मानतो.

Web Title: Karan Johar wants 'this' for one thing, marrying Shah Rukh Khan!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.