करण जोहरची 'धुरंधर'वर प्रतिक्रिया, रणवीर सिंह अन् दिग्दर्शक आदित्य धरबद्दल म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 15:34 IST2025-12-11T15:33:44+5:302025-12-11T15:34:29+5:30
करण जोहरने पोस्टमध्ये नक्की काय म्हटलं?

करण जोहरची 'धुरंधर'वर प्रतिक्रिया, रणवीर सिंह अन् दिग्दर्शक आदित्य धरबद्दल म्हणाला...
आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' सिनेमावर सध्या कौतुकाचा वर्षाव होत आहे. चाहते तर सिनेमाला तुफान प्रतिसाद देत आहेत. शिवाय इंडस्ट्रीतूनही अनेकांनी सिनेमाची स्तुती केली आहे. अक्षय कुमार, अनुपम खेर, हृतिक रोशन या सेलिब्रिटींनी 'धुरंधर'साठी पोस्ट लिहिली. दुसरीकडे सिने समीक्षक अनुपमा चोप्राने सिनेमावर टीका केल्याने तिला चांगलंच ट्रोल करण्यात आलं. तर आता चक्क करण जोहरनेही 'धुरंधर'वर स्तुतीसुमनं उधळली आहेत.
करण जोहरने इन्स्टाग्रामवर 'धुरंधर'साठी खास पोस्ट लिहिली आहे. आदित्य धरचं त्याने विशेष कौतुक केलं आहे. करण लिहितो, "जबरदस्त! आदित्य धरचा मला खूप खूप आदर वाटतो. माझा आवडता अभिनेता रणवीर सिंह..काय काम केलं आहेस...'धुरंधर'च्या संपूर्ण टीमचं अभिनंदन."

'धुरंधर' सिनेमाच्या रिलीजनंतर बरीच चर्चा होत आहे. अनेक जण सिनेमाबाबतीत संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत. सिनेमा रिलीज होताच वादाच्या भोवऱ्यातही सापडला होता. मात्र प्रेक्षक थिएटरमध्ये सिनेमाला उत्स्फुर्त प्रतिसाद देत आहेत. पुढील वर्षी १९ मार्च रोजी 'धुरंधर २'ही रिलीज होणार अशीही नुकतीच घोषणा झाली आहे.
'धुरंधर'मधील अक्षय खन्नाच्या अभिनयाचं विशेष कौतुक होत आहे. सिनेमात तो रहमान डकैतच्या भूमिकेत आहे. त्याची स्टाईल, त्याचा स्वॅग, डान्स सगळंच सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.ॉ