"जंग के मैदान में अब जंग होनी चाहिए", कंगनाच्या 'तेजस' चित्रपटाचा ट्रेलर रिलिज!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2023 11:50 IST2023-10-08T11:44:11+5:302023-10-08T11:50:09+5:30
कंगना रणौतने तिच्या बहुप्रतिक्षित 'तेजस' सिनेमाचा टिझर रिलिज केला.

Kangana
आज 8 ऑक्टोबर रोजी वायुसेना दिनानिमित्त कंगना रणौतने तिच्या बहुप्रतिक्षित 'तेजस' सिनेमाचा टिझर रिलिज केला. 'तेजस'मध्ये कंगना दमदार अॅक्शन करताना दिसणार आहे. या ट्रेलरला चाहत्यांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली आहे. ट्रेलरमध्ये दमदार डायलॉग ऐकायला येत आहेत. तर एअरफोर्स पायलटच्या ड्रेसमध्ये कंगनाच्या डॅशिंग लूकने सर्वांचं लक्ष वेधलयं.
तेजसमध्ये कंगना वायुसेना वैमानिक तेजस गिलची भूमिका साकारत आहे. RSVP निर्मित 'तेजस'मध्ये देशाचे रक्षण करण्यासाठी कसे हवाई दलाचे वैमानिक आपल्या जीवाची बाजी लावतात, हे या दाखवले आहे. ट्रेलरच्या सुरुवातील पाहायला मिळते की, एका भारतीय गुप्तहेरला पाकिस्तानने पकडले आहे. त्यानंतर कंगना रणौत मिशनवर जाण्यासाठी पुढे येते, आणि एखा ऑपरेशनची तयारी केली जाते. पण या मिशनमध्ये कंगना राणौत म्हणजेच तेजस गिलला एकामागून एक अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागत असल्याचे ट्रेलरमध्ये दिसते.
'तेजस' हा चित्रपट 27 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ट्रेलर पाहिल्यानंतर प्रेक्षक आता कंगनाच्या तेजस सिनेमाची वाट पाहत आहेत. या चित्रपटातील महिला पायलट तेजस गिलच्या तयारीसाठी कंगनाने ४ महिने प्रशिक्षण घेतले होते. भारतीय सैन्यात वापरल्या जाणार्या सर्व लढाऊ तंत्र तिने शिकून घेतले.