ती पुन्हा आली.... 'चंद्रमुखी २’चा ट्रेलर रिलीज; कंगना रणौतचा रौद्र अवतार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2023 15:52 IST2023-09-25T15:51:12+5:302023-09-25T15:52:02+5:30
अॅक्शन, हॉरर आणि रोमान्सने परिपुर्ण 'चंद्रमुखी २’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

Kangana Ranaut
अभिनेत्री कंगना रणौतचा 'चंद्रमुखी २’ या चित्रपटाचा अंगावर रोमांच आणणारा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. यात कंगना रनौतचा रुद्र अवतार पाहायला मिळतोय. आता १७ वर्षांनंतर चंद्रमुखी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अॅक्शन, हॉरर आणि रोमान्सने परिपुर्ण असलेल्या या ट्रेलरला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला आहे.
'चंद्रमुखी 2'च्या हिंदी ट्रेलरच्या सुरुवातीला एक व्यक्ती चंद्रमुखीची 17 वर्षांपूर्वीची गोष्ट एका कुटुंबाला ऐकवताना दिसत आहे. कंगना रणौत म्हणजेच चंद्रमुखी आणि राघव लॉरेन्स म्हणजेच वेट्टय्यानच्या भुमिकेत आहेत. तर सिनेमातील भूमिकेसाठी कंगना रनौत खास शास्त्रीय नृत्य शिकली. या चित्रपटात कंगना नृत्य अदांनी सगळ्यांना घायाळ करणार आहे.
दाक्षिणात्त्य चित्रपट 'चंद्रमुखी' हा २००५ मध्ये प्रदर्शित झाला होता. ब्लॉकबस्टर चंद्रमुखीमध्ये रजनीकांत आणि ज्योतिका यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. चंद्रमुखीच्या पहिला भागाला प्रेक्षकांनी तूफान प्रतिसाद दिला होता. या चित्रपटाचा 'चंद्रमुखी 2' हा दुसरा भाग आहे. २८ सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात 'चंद्रमुखी 2' पाहायला मिळेल. आता चंद्रमुखी आणि वेट्टैयन आमने-सामने आल्यानंतर काय होणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
कंगनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, ती 'इमरजेंसी' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात ती माजी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या भूमिकेत दिसेल. त्याशिवाय ती आगामी 'तेजस' सिनेमातह भारतीय पायलटच्या भूमिकेत असणार आहे.