दीपिका, प्रियंका आलिया पाठोपाठ 'ही' अभिनेत्री हॉलिवूडमध्ये करणार पदार्पण, ओळखलं का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 16:33 IST2025-05-09T16:33:36+5:302025-05-09T16:33:51+5:30

हॉलिवूडच्या हॉरर ड्रामामध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Kangana Ranaut To Make Hollywood Debut Blessed Be The Evil Horror Drama Details Inside | दीपिका, प्रियंका आलिया पाठोपाठ 'ही' अभिनेत्री हॉलिवूडमध्ये करणार पदार्पण, ओळखलं का?

दीपिका, प्रियंका आलिया पाठोपाठ 'ही' अभिनेत्री हॉलिवूडमध्ये करणार पदार्पण, ओळखलं का?

Kangana Hollywood Debut: राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranaut) हिच्या अभिनयाची स्तुती करावी तेवढी कमीच आहे. तिच्याकडे विलक्षण अभिनय कौशल्य तर आहेच, पण ती फक्त डोळ्यांतूनही बोलू शकतो. अनके सिनेमांमधून आपण तिचा सहज सुंदर अभिनय पाहिला आहे. 'क्वीन' सिनेमातील तिचा अभिनय आजही सर्वांच्या लक्षात आहे. ही अष्टपैलू अभिनेत्री हॉलिवूडच्या वाटेवर निघाल्याची चर्चा आहे. हॉलिवूडच्या एका चित्रपटात कंगनाची वर्णी लागल्याची माहिती समोर आली आहे. 

 कंगना राणौत ही 'ब्लेस्ड बी द एव्हिल' या हॉरर ड्रामामधून हॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे.  कंगना या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहे. ज्यामध्ये टीन वुल्फ फेम अभिनेता टायलर पोसी आणि स्कारलेट रोज स्टॅलोन देखील आहेत. या चित्रपटात  ड्रामा, थ्रिल आणि सस्पेंसचा परिपुर्ण डोस असणार आहे. लवकरच सिनेमाचं न्यू यॉर्कमध्ये शुटिंग सुरू होणार असल्याची माहिती आहे. 'ब्लेस्ड बी द एव्हिल'चे दिग्दर्शन 'टेलिंग पॉन्ड' या चित्रपटासाठी प्रसिद्ध असलेले अनुराग रुद्र करणार आहेत.


कंगना ही आजच्या घडीची पॉवरफुल अभिनेत्री आहे.  चार राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि चार फिल्मफेअर पुरस्कारांव्यतिरिक्त ती एक चित्रपट निर्माता आहे. ऐवढंच नाही तर लोकसभा खासदार देखील आहेत. कंगनाच्या आधी अभिनेत्री प्रियंका चोप्रा, आलिया भट आणि दीपिका पादुकोन यांनी हॉलिवूड चित्रपट केले आहेत. आता कंगना राणौत हॉलिवूडमध्ये आपला जम कसा बसवणार हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे.

Web Title: Kangana Ranaut To Make Hollywood Debut Blessed Be The Evil Horror Drama Details Inside

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.