Kangana Ranaut Shah Rukh Khan : 'भारतात फक्त जय श्री राम...' Shahrukh Khan च्या 'पठाण'वर Kangana Ranaut ची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2023 10:10 AM2023-01-27T10:10:28+5:302023-01-27T10:11:01+5:30

Kangana Ranaut on Pathaan : कंगना रणौतने ट्विटरवर Pathan चित्रपटाबाबत एक लांबलचक नोट लिहिली आहे.

Kangana Ranaut Shah Rukh Khan: 'Only Jai Shri Ram in India...' Kangana Ranaut reacts to Shahrukh Khan's 'Pathan' | Kangana Ranaut Shah Rukh Khan : 'भारतात फक्त जय श्री राम...' Shahrukh Khan च्या 'पठाण'वर Kangana Ranaut ची प्रतिक्रिया

Kangana Ranaut Shah Rukh Khan : 'भारतात फक्त जय श्री राम...' Shahrukh Khan च्या 'पठाण'वर Kangana Ranaut ची प्रतिक्रिया

googlenewsNext


Kangana Ranaut on Pathaan: शाहरुख खानच्या 'पठाण' (Pathaan) चित्रपटाने जबरदस्त कामगिरी करत बॉक्स ऑफिसवर सर्व जुने रेकॉर्ड मोडले आहेत. चित्रपटाच्या यशावर अभिनेत्री कंगना रणौतने (Kangana Ranaut) प्रतिक्रिया दिली आहे. कंगनाने एका कार्यक्रमात पठाणचे कौतुक केले होते आणि म्हटले होते की, चित्रपट चांगला चालला आहे, असे चित्रपट सुरुच राहिले पाहिजेत. आता कंगनाने तिच्या ट्विटर हँडलवर पठाणच्या यशाबद्दल एक लांबलचक नोटही लिहिली आहे. यातून तिने काही लोकांना कडक शब्दात सुनावलेही आहे. 

कंगनाने लिहिले की, 'पठाण चित्रपट द्वेषावर प्रेमाचा विजय असल्याचा दावा करणाऱ्या सर्वांशी मी सहमत आहे, पण कोणाच्या द्वेषावर प्रेमाचा विजय झाला? चला मुद्द्यावर येऊया...तिकीट खरेदी करून कोण चित्रपट यशस्वी करत आहे? हे भारताचे प्रेम आहे, जिथे 80% हिंदू राहतात आणि इथे पठाण नावाचा चित्रपट बनवला जातो, ज्यात आपला शत्रू देश पाकिस्तान आणि ISIS दाखवला गेला आणि तो चित्रपट यशस्वीही झाला. ही आपल्या भारताची भावना आहे. '

हे आपल्या भारतीयांचे प्रेम आहे, जे द्वेषावर आणि घाणेरड्या राजकारणाच्याही पुढे आहे. पण ज्यांना मोठ्या आशा आहेत, त्यांना मी सांगू इच्छिते की पठाण हा फक्त एक चित्रपट असू शकतो, पण भारतात फक्त जय श्री राम, जय श्री राम हा नाराच राहणार...माझा विश्वास आहे की भारतीय मुस्लीम देशभक्त आहेत आणि अफगाण पठाणांपेक्षा खूप वेगळे आहेत… मुख्य म्हणजे भारत कधीच अफगाणिस्तान होणार नाही, अफगाणिस्तानमध्ये काय चालले आहे हे आपल्या सर्वांना माहित आहे. तिथे नरकापेक्षाही वाईट परिस्थिती आहे, म्हणून पठाण चित्रपटाचे कथानकानुसार योग्य नाव भारतीय पठाण असायला हवे.'

कंगना ट्विटरवर परतली आहे
कंगना तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. सोशल मीडियावर ती प्रत्येक मुद्द्यावर आपले मत उघडपणे मांडते. वादांमुळे तिने काही काळापूर्वी ट्विटर सोडले होते, मात्र आता ती ट्विटरवर परतली आहे. सध्या कंगना तिच्या आगामी 'इमर्जन्सी' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात ती इंदिरा गांधींच्या भूमिकेत दिसणार आहे. नुकतंच या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. कंगनाने या चित्रपटाबाबत लिहिलेल्या पोस्टमध्ये खुलासा केला होता की, हा चित्रपट बनवण्यासाठी तिने तिचे घर गहाण ठेवले आहे.

Web Title: Kangana Ranaut Shah Rukh Khan: 'Only Jai Shri Ram in India...' Kangana Ranaut reacts to Shahrukh Khan's 'Pathan'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.