कंगणा राणौतला गंभीर दुखापत,कपाळावर पडले तब्बल 15 टाके

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2017 11:16 IST2017-07-20T05:15:26+5:302017-07-20T11:16:53+5:30

गेल्या काही दिवसांपासून कंगणा राणौत जास्त चर्चेत आहे. आता तर बॉलिवूडची क्वीन कंगणा राणौतच्या काळजी वाढवणारी एक बातमी समोर ...

Kangana Ranaut got serious injuries and 15 blanks were lying on the forehead | कंगणा राणौतला गंभीर दुखापत,कपाळावर पडले तब्बल 15 टाके

कंगणा राणौतला गंभीर दुखापत,कपाळावर पडले तब्बल 15 टाके

ल्या काही दिवसांपासून कंगणा राणौत जास्त चर्चेत आहे. आता तर बॉलिवूडची क्वीन कंगणा राणौतच्या काळजी वाढवणारी एक बातमी समोर आली आहे. अभिनेत्री कंगणा राणौत एका अपघातात बाल-बाल बचावली आहे.'मणिकर्णिका :द क्वीन ऑफ झांसी'  या सिनेमाच्या शुटिंग दरम्यान कंगणा थोडक्यात वाचलीय. या सिनेमाचं हैदराबादमध्ये शुटिंग सुरु आहे. या शुटिंग दरम्यान कंगणा आणि तिचा सहकलाकार निहार पांडेसोबत एका सीनचं चित्रीकरण सुरु होतं. या फाईट सीनमध्ये तलवारीबाजीचा स्टंट सुरु होता. अभिनेता निहार हा कंगणावर तलवारीने आघात करतो असा हा सीन होता.मात्र निहारने केलेल्या आघाताचं टायमिंग चुकलं आणि हा आघात कंगणाच्या कपाळावर पडला. या आघातामुळे कंगणा गंभीर जखमी झाली. रक्तबंबाळ अवस्थेत कंगणाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. कंगणाची ही दुखापत इतकी गंभीर आहे की तिच्या कपाळावर तब्बल 15 टाके पडले आहेत. डॉक्टरांनी कंगणाला विश्रांतीचा सल्ला दिला आहे. 

कंगनाने या सिनेमासाठी घोडेस्वारीचे प्रशिक्षण घेतले होते.घोडेस्वारीचे प्रशिक्षण घेत्यानंतर तिने हॉलिवूडचा अॅवॉर्ड विनिंग स्टंट डायरेक्टर निक पॉवेलकडून तलावरबाजीचे प्रशिक्षण घेतले. कंगणाला प्रशिक्षण देण्यासाठी निक खास अमेरिकेहून भारतात आला होता.प्रत्येक विकेंडला कंगना निक पॉवेल तलवारबाजीचे प्रशिक्षण घेत होती.निकने कंगणाला तलवारबाजी आणि हाताने केल्या जाणाऱ्या लढाईचे बेसिक ट्रेनिंगही दिले आहे. 'मणिकर्णिका :द क्वीन ऑफ झांसी' हा सिनेमा अॅक्शन सिनेमा आहे.त्यासाठी घोडेस्वारी आणि तलवारबाजी बारकावे समजून घेण्यासाठी कंगणाने ट्रेनिंग दरम्यान खूप मेहनतही घेतली होती. तलवारबाजी आणि घोडेस्वारी हे तिने आधी केले नव्हते.त्यामुळे कंगणासाठी या दोन्ही गोष्टी आव्हानात्मक होत्या.खास कंगना रोज 2 तास निककडून प्रशिक्षण घ्यायची. 

Web Title: Kangana Ranaut got serious injuries and 15 blanks were lying on the forehead