Kajol : अचानक इतकी गोरी कशी झाली? काजोलने ट्रोलर्सना दिलं कडक उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2023 04:17 PM2023-02-09T16:17:02+5:302023-02-09T16:17:54+5:30

Kajol : रंगावरून ट्रोल करणाऱ्या ट्रोलर्सला काजोलने जबरदस्त उत्तर दिलं आहे...

Kajol Gives Svage Reply To Trollers Who Ask Her How She Became So Fair | Kajol : अचानक इतकी गोरी कशी झाली? काजोलने ट्रोलर्सना दिलं कडक उत्तर

Kajol : अचानक इतकी गोरी कशी झाली? काजोलने ट्रोलर्सना दिलं कडक उत्तर

googlenewsNext

काजोल (Kajol )आताश: मोजके सिनेमे करते. पण तिची क्रेझ अद्यापही कमी झालेली नाही. सोशल मीडियावर काजाेल प्रचंड ॲक्टीव्ह आहे. साहजिकच सोशल मीडिया म्हटलं की, ट्रोल होणं आलंच. या ना त्या कारणावरू काजोलला सुद्धा ट्रोल केलं जातं. आता काजोलने तिच्या रंगावरून ट्रोल करणाऱ्या ट्रोलर्सला जबरदस्त उत्तर दिलं आहे.

काजोलने इन्स्टाग्रामवर एखादा नवा फोटो शेअर केला रे केला की, काही ट्रोलर्स तिला ट्रोल करायला लागतात. तिचे जुने फोटो शेअर करून तिला डिवचतात. तू स्क्रीन लाइटनिंग ट्रीटमेंट केली का? असा प्रश्न विचारून भंडावून सोडतात. आता हा प्रश्न विचारणाऱ्यांना काजोलने उत्तर दिलं आहे. तिने एक इन्स्टा स्टोरी शेअर केली आहे. यात तिने मास्कने तिचा चेहरा पूर्णपणे झाकलेला आहे. डोळ्यांवर गॉगल आहे. या पोस्टसोबत काजोलने लिहिलेलं कॅप्शन खास आहे. मी इतकी गोरी कशी काय झाले, असं विचारणाऱ्या सर्वांसाठी..., असं तिने लिहिलं आहे.

कशी इतकी उजळली काजोल?
इंडस्ट्रीत आली तेव्हा काजोल बरीच सावळी होती. यानंतर काही वर्षांनी ती इतकी उजळली की, तिला पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. काजोलने स्कीन लाइटनिंग सर्जरी केल्याचा दावा अनेकांनी केला होता. मात्र २०१४ मध्ये पिंकविलाला दिलेल्या एका मुलाखतीत काजोलने अशी कुठलीही सर्जरी केल्याचं नाकारलं होतं. मी कोणतही स्कीन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही. मी फक्त उन्हापासून दूर राहते. सुरूवातीला सलग १० वर्ष मी उन्हात काम केलं. मी माझ्या स्कीनची अजिबात काळजी घेतली नाही. त्यामुळे मी टॅन झाले होते. पण यानंतर मी उन्हात काम करणं पूर्णपणे बंद केलं आणि मी अनटॅन्ड झाले. ही कोणतीही स्कीन व्हाइटनिंग सर्जरी नाहीये तर घरी राहण्याची सर्जरी आहे, असं तिने सांगितलं होतं.

Web Title: Kajol Gives Svage Reply To Trollers Who Ask Her How She Became So Fair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.