Video: नुसता वेडेपणा! 'बोले चुडियाँ'वर फराह खान- करण जोहरचा अतरंगी डान्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2021 19:30 IST2021-12-09T19:30:00+5:302021-12-09T19:30:00+5:30
Karan-farah khan dance video: या व्हिडीओमध्ये दोघंही 'कभी खुशी कभी गम' (kabhi khushi kabhie gham) या चित्रपटातील 'बोले चुडियाँ' या गाण्यावर डान्स करत आहेत.

Video: नुसता वेडेपणा! 'बोले चुडियाँ'वर फराह खान- करण जोहरचा अतरंगी डान्स
सध्याच्या काळात कोणत्याही क्षेत्राकडे पाहिलं तर त्यात स्पर्धा असल्याचं पाहायला मिळतं. हीच स्पर्धा कलाविश्वातही असल्याचं पाहायला मिळतं. मात्र, या स्पर्धात्मक युगात बॉलिवूडमध्ये असे काही सेलिब्रिटी आहेत. जे एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. यात करीना कपूर - मलायका अरोरा, शाहरुख खान- फराह खान अशा कितीतरी बेस्ट फ्रेंडच्या जोड्या पाहायला मिळतात. विशेष म्हणजे यांच्यामध्येच प्रसिद्ध कोरिओग्राफर फराह खान (farah khan) आणि दिग्दर्शक, निर्माता करण जोहर (karan johar) यांच्या मैत्रीविषयी फारसं काही वेगळं सांगायला नको. या दोघांची मैत्री संपूर्ण कलाविश्वाला माहित आहे. अलिकडेच या दोघांनी एक भन्नाट डान्स व्हिडीओ शेअर केला आहे.
फराह खानने अलिकडेच तिच्या इन्स्टाग्रामवर करणसोबतचा एक डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दोघंही 'कभी खुशी कभी गम' (kabhi khushi kabhie gham) या चित्रपटातील 'बोले चुडियाँ' या गाण्यावर डान्स करत आहेत. मात्र, त्यांचा हा भलताच अतरंगी असून अनेकांना हसू अनावर झालं आहे.
दरम्यान, करण आणि फराह खान यांची मैत्री खूप जुनी आहे. अनेक कार्यक्रमांमध्ये त्यांनी त्यांच्या मैत्रीचे किस्से चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. सोबतच अनेक चित्रपटांमध्येही या दोघांनी एकत्र काम केलं आहे.