जान्हवी कपूरला लागली लॉटर; सुपरस्टार NTR नंतर आता रामचरणसोबत या चित्रपटात झळकणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2024 19:01 IST2024-02-07T19:00:27+5:302024-02-07T19:01:23+5:30
गेल्या काही काळापासून जान्हवी कपूर चर्चेत आहे.

जान्हवी कपूरला लागली लॉटर; सुपरस्टार NTR नंतर आता रामचरणसोबत या चित्रपटात झळकणार
Janhvi Kapoor- अभिनेत्री जान्हवी कपूरला (Janhvi Kapoor) मोठी लॉटरी लागली आहे. जान्हवी लवकरच सुपरस्टार Jr. NTR सोबत 'देवरा' चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाबाबत चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. आता अशी माहिती मिळतीये की, जान्हवीची साऊथचाच आणखी एक सुपरस्टार रामचरणच्या (Ram Charan) आगामी चित्रपट वर्णी लागली आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये बॉलिवूड कलाकारांचा साऊथ सिनेमांकडे कल वाढला आहे. तर दक्षिणेतील दिग्दर्शक बॉलिवूड स्टार्ससोबत काम करत आहेत. अशातच जान्हवी कपूर RRR फेम Jr. NTR आणि Ram Charan च्या चित्रपटांमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे अद्याप नाव ठरले नसून, याला RC16 म्हटलेजात आहे. 'उपन्ना' फेम बुची बाबू सना या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, जान्हवीने हा प्रोजेक्ट साईन केला असून, ती साऊथ सुपरस्टार राम चरणसोबत मुख्य भूमिकेत असेल. जान्हवी कपूरच्या आधी समंथा रुथ प्रभू आणि राशा थडानी यांची नावे चर्चेत होती. विशेष म्हणजे प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक एआर रहमान या चित्रपटाला संगीत देणार आहेत.
जान्हवी कपूरकडे सध्या अनेक चित्रपट आहेत. ती फक्त साऊथच नाही, तर बॉलिवूडच्या अनेक सिनेमांच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. लवकरच तिचा पहिला साऊथ सिनेमा देवरा रिलीज होईल, त्यानंतर ती राम चरणसोबत स्क्रीन शेअर करताना दिसेल.