जान्हवी कपूरच्या सौंदर्याकडे पाहतच राहिला बॉयफ्रेंड शिखर पहाडिया, फोटो पोस्ट करत म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2024 09:58 IST2024-09-28T09:57:29+5:302024-09-28T09:58:08+5:30

जान्हवी कपूर काही वर्षांपासून बिझनेसनमन शिखर पहाडियाला डेट करत आहे.

Janhvi Kapoor boyfriend Shikhar Pahariya praises her beauty after watching Devara | जान्हवी कपूरच्या सौंदर्याकडे पाहतच राहिला बॉयफ्रेंड शिखर पहाडिया, फोटो पोस्ट करत म्हणाला...

जान्हवी कपूरच्या सौंदर्याकडे पाहतच राहिला बॉयफ्रेंड शिखर पहाडिया, फोटो पोस्ट करत म्हणाला...

अभिनेत्री जान्हवी कपूरने (Janhvi Kapoor) दाक्षिणात्य सिनेसृष्टीत दमदार पदार्पण केलं आहे. जान्हवीचा 'देवरा' (Devara) सिनेमा नुकताच रिलीज झाला. साऊथ सुपरस्टार ज्युनिअर एनटीआरसोबत तिने पदार्पणातच लक्ष वेधून घेतलं. शिवाय सिनेमा सैफ अली खान खलनायकाच्या भूमिकेत दिसला. पडद्यावर जान्हवीचं  सौंदर्य पाहून तिचा कथित बॉयफ्रेंड शिखर पहाडियाही (Shikhar Pahariya) फिदा झाला आहे. सिनेमा पाहून सोशल मीडियावर त्याने प्रतिक्रियाही दिली आहे.

जान्हवी कपूर काही वर्षांपासून बिझनेसनमन शिखर पहाडियाला डेट करत आहे. सध्या दोघंही अनेकदा इव्हेंट्स, फंक्शन, पार्टीज साठी एकत्र दिसतात. जान्हवी त्याला प्रेमाने 'शिखू' म्हणते हेही तिने सांगितलं. तर शिखरही जान्हवीची खुल्लमखुल्ला स्तुती करताना दिसतो. काल 'देवरा' थिएटरमध्ये रिलीज झाला. शिखरने इन्स्टाग्राम स्टोरीवर दोन फोटो शेअर केले. पहिल्या फोटोत त्याने 'देवरा' टायटलचा फोटो पोस्ट करत लिहिले, 'wooohoo'. तर दुसऱ्या फोटोत त्याने जान्हवीचा क्लोजअप शेअर केला आहे. यात तिचं सौंदर्य मोठ्या पडद्यावर पाहून तोही घायाळ झाला. शिखरने लिहिले, 'मी स्वप्न बघत आहे का?' 

जान्हवी आणि शिखरची केमिस्ट्री नेहमीच चर्चेत असते. दोघंही लवकरच लग्न करणार अशीही चर्चा झाली. मात्र सध्या तरी त्यांचा लग्नाचा प्लॅन नाही असं जान्हवी म्हणाली होती. सध्या ती करिअरवर लक्ष देत आहे. साऊथमध्ये ज्युनिअर एनटीआरसोबत झळकल्यानंतर ती सुपरस्टार रामचरणसोबतही दिसणार आहे. त्यांचा RC16 सिनेमा याचवर्षी प्रदर्शित होणार आहे. शिवाय जान्हवी आणि वरुण धवनचा 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' हा सिनेमा पुढील वर्षी येणार आहे. 

Web Title: Janhvi Kapoor boyfriend Shikhar Pahariya praises her beauty after watching Devara