जॅकलीन फर्नांडिसने उर्वशी रौतेलाची स्टाइल केली कॉपी; नेटकऱ्यांनी पकडली तिची चोरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2023 19:13 IST2023-11-30T19:12:28+5:302023-11-30T19:13:05+5:30
Jacqueline fernandez: जॅकलीनने उर्वशी रौतेला हिला कॉपी केल्यामुळे नेटकऱ्यांनी तिची खिल्ली उडवली आहे.

जॅकलीन फर्नांडिसने उर्वशी रौतेलाची स्टाइल केली कॉपी; नेटकऱ्यांनी पकडली तिची चोरी
बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी त्यांच्या हटके फॅशनसेन्स आणि स्टाइल स्टेटमेंटसाठी ओळखले जातात. बॉलिवूड कलाकारांकडे पाहूनच बाजारात अनेक नवनवीन ट्रेंड येत असतात आणि चाहते तो ट्रेंड फॉलोही करत असतात. मात्र, बऱ्याचदा असंही होतं की कलाकार एकमेकांची स्टाइल फॉलो करतात. यात काही कलाकार सोशल मीडियावर ट्रोल होतात. तर, काहींना चाहत्यांकडून पसंती मिळते. मात्र, यावेळी अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस (jacqueline fernandez) हिने उर्वशी रौतेला (urvashi rautela) हिला कॉपी केल्यामुळे नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे.
जॅकलीन सध्या सौदी अरेबियामध्ये असून येथील डेझर्ट सफारीचे काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिचे हे फोटो पाहिल्यानंतर तिने उर्वशी रौतेलाची स्टाइल कॉपी केल्याचं म्हटलं जात आहे. या डेझर्ट सफारीमध्ये जॅकलीनने हटके सनग्लासेस आणि त्याला मॅच होणारे इअररिंग्स घातले होते. परंतु, काही दिवसांपूर्वीच उर्वशी रौतेलाने सेम टू सेम सनग्लासेस आणि इअररिंग्स घालून फोटोशूट केलं होतं. ज्यावेळी जॅकलीनने ही अॅक्ससरिज घातली त्याचवेळी लोकांनी ते ओळखलं आणि तिला ट्रोल करायला सुरुवात केली.
सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या उर्वशीने अलिकडेच अमाना ज्वेलर्सचे दागीने घालून फोटोशूट केलं होतं. यात तिने पिंक रंगाचा लेटेक्स मिडी ड्रेस परिधान केला होता. त्यावर साजेशी कस्टमाइज्ड झुमके, अंगठ्या, बांगड्या आणि एक हँडबॅग कॅरी केली होती. तिचा हा लूक पाहून इन्स्पायर झालेल्या जॅकलीनने सुद्धा पंखांच्या आकाराचे सनग्लासेस आणि मॅक्सिमा द शोल्डर डस्टर इअररिंग्स परिधान केले.
दरम्यान, उर्वशी लवकरच दिल है ग्रे आणि ब्लॅक रोझ या सिनेमात दिसणार आहे. तर, जॅकलीन वेलकम टू द जंगल मध्ये झळकणार आहे.