"बरं झालं ते नातं संपलं...", आमिर खानच्या घटस्फोटावर असं का म्हणाली लेक आयरा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2024 14:16 IST2024-11-30T14:15:56+5:302024-11-30T14:16:35+5:30
वडिलांच्या घटस्फोटाचा आयराच्या मानसिकतेवर परिणाम झाला का? म्हणाली...

"बरं झालं ते नातं संपलं...", आमिर खानच्या घटस्फोटावर असं का म्हणाली लेक आयरा?
आमिर खान (Aamir Khan) बॉलिवूडमध्ये 'द परफेक्शनिस्ट' म्हणून ओळखला जातो. मात्र अभिनेत्याच्या वैयक्तिक आयुष्यात आतापर्यंत बरीच उलाथापलथ झाली. आमिर आणि पहिली पत्नी रीना दत्ताचा (Reena Dutta) लग्नाच्या १६ वर्षांनी घटस्फोट झाला होता. २००२ मध्ये ते वेगळे झाले. आमिर आणि रीना यांना जुनैद हा मुलगा आणि आयरा ही मुलगी आहे. दरम्यान नुकतंच आयराने (Ira Khan) आईवडिलांच्या घटस्फोटावर भाष्य केलं आहे.
आमिर खान आणि रीना दत्ता यांच्या घटस्फोटाचा लेक आयरावर मानसिकरित्या परिणाम झाला होता का? याविषयी बोलताना आयरा म्हणाली, "त्या दोघांनी आमच्यासमोर कधीच भांडण केलं नाही. आमच्यासाठी ते नेहमीच एकत्र असायचे. त्यांची भांडणं त्यांनी आमच्यापासून नेहमीच दूर ठेवली. या सगळ्या प्रकारातही ते एक कुटुंब म्हणून एकमेकांवर प्रेम करत होते."
ती पुढे म्हणाली, "मला वाटलं की नाही त्यांच्या घटस्फोट माझ्यावर नकारात्मक परिणाम होणार नाही. जशी मी मोठी झाले मला याची जाणीव झाली की एखादी गोष्ट तुटल्याने ते नातं चांगल्या पद्धतीने संपलं. कदाचित त्यांचा घटस्फोट झाला हे चांगलंच झालं. काही काळ वाईट वाटलं पण यामुळे माझ्यातील लहान मुलीवर याचा परिणाम झाला नाही."
आमिर खानने नंतर २००५ साली दिग्दर्शिका किरण रावसोबत लग्नगाठ बांधली. मात्र हे लग्नही १६ वर्ष चाललं आणि २०२१ साली त्यांचा घटस्फोट झाला. त्यांना आजाद हा मुलगा आहे. तर आयरा खानने गेल्या वर्षी बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत लग्नगाठ बांधली.