'बॉर्डर' आणि 'बॉर्डर २' सिनेमांचा काही संबंध नाही? नेटकऱ्यांनी टीझरमधून पकडली 'ही' मोठी गोष्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 11:39 IST2025-12-17T11:36:56+5:302025-12-17T11:39:50+5:30
सर्वांना वाटत होतं की 'बॉर्डर २' हा बॉर्डर सिनेमाचा सीक्वल आहे. पण आता याविषयी मोठी माहिती समोर आली आहे जी वाचून तुम्ही थक्क व्हाल

'बॉर्डर' आणि 'बॉर्डर २' सिनेमांचा काही संबंध नाही? नेटकऱ्यांनी टीझरमधून पकडली 'ही' मोठी गोष्ट
१९९७ साली रिलीज झालेल्या 'बॉर्डर' सिनेमाने प्रेक्षकांच्या मनात देशभक्ती जागवली. दिग्गज कलाकारांची फौज असलेला 'बॉर्डर' सिनेमा आजही आवडीने पाहिला जातो. अशातच काल या सिनेमाचा सीक्वल अर्थात 'बॉर्डर २'ची घोषणा करण्यात आली. सनी देओल पुन्हा एकदा सिनेमात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. परंतु 'बॉर्डर २' हा सीक्वल आहे की स्वतंत्र सिनेमा आहे? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. कारण नेटकऱ्यांनी टीझरमधील एक मोठी गोष्ट हेरली आहे.
'बॉर्डर २' हा सीक्वल नाही?
सनी देओलने 'बॉर्डर' सिनेमात कुलदीप सिंह चांदपुरी ही भूमिका साकारली होती. परंतु सध्या असा दावा केला जातोय सनी 'बॉर्डर २'मध्ये वेगळी भूमिका साकारणार आहे. 'बॉर्डर २'चा टीझर आल्यावर सनी देओल पुन्हा जोशपूर्ण अवस्थेत अभिनय करताना दिसला. १ मिनिच १४ सेकंदाच्या या टीझरमध्ये सनी देओलच्या दमदार अभिनयाची झलक सर्वांना पाहायला मिळाली. पण या टीझरमध्ये सनी देओलने जी आर्मीची वर्दी परिधान केली आहे ती बघून सर्वांना धक्का बसला आहे.
नेटकऱ्यांनी सनी देओलच्या वर्दीच्या ठिकाणी थोडं झूम करुन बघितलं. त्यावेळी वर्दीवर वेगळीच नेमप्लेट बघायला मिळाली. सनी देओलच्या वर्दीवर 'फतेह सिंग कलेर' हे नाव बघायला मिळालं. त्यामुळेच सनी देओल 'बॉर्डर'मधील कुलदीप सिंहची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार नाही. सनी देओल वेगळ्याच फतेह सिंह या वेगळ्याच व्यक्तिरेखेतून भेटीला येणार आहे. त्यामुळेच 'बॉर्डर' आणि 'बॉर्डर २'च्या कथानकाचा एकमेकांशी काही संबंध नसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आता यामागची खरी कहाणी काय, हे 'बॉर्डर २' सिनेमा आल्यावरच कळेल.