Jab We Met: 'जब वी मेट'चा सीक्वेल का बनू शकत नाही? इम्तियाज अलीने स्पष्टच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2024 13:35 IST2024-05-06T13:34:37+5:302024-05-06T13:35:23+5:30
करीना कपूरसोबत पुन्हा काम का केलं नाही? यावरही दिलं थेट उत्तर

Jab We Met: 'जब वी मेट'चा सीक्वेल का बनू शकत नाही? इम्तियाज अलीने स्पष्टच सांगितलं
इम्तियाज अली (Imtiaz Ali) यांचा 2007 साली आलेला'जब वी मेट' (Jab We Met) सिनेमा आजही प्रेक्षकांच्या जवळचा आहे. सिनेमातील शाहीद कपूर आणि करीना कपूरची केमिस्ट्री सुपरहिट झाली. 'जब वी मेट'चे चाहते सतत सिनेमाच्या सीक्वेलबाबत उत्सुक असतात. खरंच याचा सीक्वेल येणार का याबाबत आता इम्तियाज अलीनेच स्पष्ट उत्तर दिलं आहे. तसंच करीना कपूरसोबत (Kareena Kapoor) पुन्हा काम न करण्यामागचं कारणही त्याने सांगितलं आहे.
इम्तियाज अलीने न्यूज 18 शोशाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले, "जब वी मेट चा सीक्वेल का बनला पाहिजे? जर लोकांना सिनेमा एन्जॉय करायचा आहे तर ते पहिला पार्ट पाहू शकता. पण जब वी मेट 2 बनवण्यासाठी स्क्रीप्ट आणि तसं कारणही पाहिजे. पण बघुया काय होतं. कारण कधीही काहीही होऊ शकतं."
जब वी मेट 2 का येऊ शकत नाही?
2020 मध्ये इम्तियाज अलीने सारा अली खान आणि कार्तिक आर्यनसोबत 'लव्ह आज कल 2' सिनेमा आणला. पण तो फ्लॉप झाला. हा सिनेमा सैफ अली खान आणि दीपिका पदुकोणच्या 'लव्ह आज कल' चा सीक्वेल होता. लव्ह आज कल 2 फ्लॉप झाल्यामुळेच जब मी मेटची सीक्वेल आणणार नाही का? असा प्रश्न इम्तियाज अलीला विचारण्यात आला. यावर तो हसतच म्हणाला,"मी लव्ह आज कल 2 दुसऱ्यांदा बनवला पण लोकांना तो आवडला नाही. पण जब वी मेटच्या सीक्वेलमागे हे कारण नाही. जोपर्यंत सीक्वेल बनवायचं ठोस कारण सापडत नाही तोवर कोणीच काही करु शकत नाही."
करीना कपूरसोबत पुन्हा काम का केलं नाही?
इम्तियाज अली म्हणाला, "जेव्हा तुम्ही एखाद्या कलाकारासोबत काम करता तेव्हा तुम्ही केवळ दिखाव्यासाठी करत नाही ना ही सुद्धा जबाबदारी असते. पहिल्या प्रोजेक्टच्या अपेक्षेपेक्षा दुसरा प्रोजेक्ट वेगळा असेल तरच पुन्हा काम करण्याची कल्पना चांगली असते. करीना आणि मला पुन्हा एकत्र काम करायचं आहे पण 2007 नंतर आजपर्यंत अशी संधी मिळाली नाही. कारण आम्ही जे आधी करुन दाखवलंय त्यापेक्षा चांगलं आणि वेगळं अद्याप मिळालेलं नाही."