गर्लफ्रेंडला 'होमब्रेकर' म्हणायला लागले लोक, इमरानचं अखेर घटस्फोटावर मौन सोडत स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2025 15:50 IST2025-04-13T15:49:42+5:302025-04-13T15:50:46+5:30

आमिर खानचा भाचा इमरान खान त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत आहे.

imran khan breaks silence on divorce with avantika malik says there was no support left in our relationship | गर्लफ्रेंडला 'होमब्रेकर' म्हणायला लागले लोक, इमरानचं अखेर घटस्फोटावर मौन सोडत स्पष्टीकरण

गर्लफ्रेंडला 'होमब्रेकर' म्हणायला लागले लोक, इमरानचं अखेर घटस्फोटावर मौन सोडत स्पष्टीकरण

आमिर खानचा भाचा इमरान खान (Imran Khan) त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत आहे. २०१९ साली त्याचा पत्नी अवंतिका मलिकसोबत घटस्फोट झाला होता. तर सध्या तो लेखा वॉशिंग्टनला डेट करत आहे. मात्र अवंतिकासोबत त्याचं लग्न का मोडलं याचा खुलासा त्याने आता केला आहे. इतकी वर्ष त्याने घटस्फोटावर काहीच भाष्य केलं नव्हतं. मात्र आता त्याच्या गर्लफ्रेंडला घर तोडणारी संबोधलं जाऊ लागल्याने त्याने खरं कारण सांगितलं आहे.

एका मुलाखतीत इमरान खान म्हणाला, "आम्ही एकमेकांना तो सपोर्ट देऊ शकत नव्हतो जो आम्हाला स्वत:ला आनंदी राहण्यासाठी गरजेचा होता. मी आणि अवंतिका वयाच्या १९ व्या वर्षीच रिलेशनशिपमध्ये आलो होतो. तेव्हा आम्ही स्वत: इतके मॅच्युअर नव्हतो. काळानुसार आमच्यात बदल झाला, आमचं नातं आधी होतं तसं राहिलं नाही त्यामुळे आम्ही वेगळं होणंच पसंत केलं."

इमरान गेल्या अनेक वर्षांपासून सिनेसृष्टीपासूनही दूर आहे. तो एका भाड्याच्या घरात राहत असून त्याने त्याच्या गरजाही कमी केल्याचं एका मुलाखतीत सांगितलं होतं. दरम्यान दीड वर्षांपूर्वीच त्याच्या आयुष्यात लेखा वॉशिंग्टनची एन्ट्री झाली. दोघंही सध्या लिव्हइनमध्ये राहत आहेत. मात्र लेखाला सर्वांना होम ब्रेकर म्हणायला सुरुवात केली. तेव्हा मी लेखाला भेटण्याच्या बरंच आधी माझी घटस्फोट झाला होता असं स्पष्टीकरण इमरानने दिलं होतं.

इमरान आणि अवंतिकाला इमारा ही मुलगी आहे. आपल्या तुटलेल्या नात्याचा मुलीवर परिणाम होऊ द्यायचा नाही असं दोघांनी ठरवलं. छोटी इमारा रात्री जेव्हा गप्पा मारते तो क्षण माझ्यासाठी सर्वकाही आहे असंही तो म्हणाला.

Web Title: imran khan breaks silence on divorce with avantika malik says there was no support left in our relationship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.