अमृता-सैफचा लाडका लेक इब्राहिम अली खानची इन्स्टाग्रामवर एन्ट्री, अवघ्या काही तासांत झाले 'इतके' फॉलोवर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2024 03:24 PM2024-04-30T15:24:25+5:302024-04-30T15:27:33+5:30

इब्राहिम अली खानने त्याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत

Ibrahim Ali Khan makes his Instagram debut first Instagram post is all about legacy See his Nawabi pictures | अमृता-सैफचा लाडका लेक इब्राहिम अली खानची इन्स्टाग्रामवर एन्ट्री, अवघ्या काही तासांत झाले 'इतके' फॉलोवर्स

अमृता-सैफचा लाडका लेक इब्राहिम अली खानची इन्स्टाग्रामवर एन्ट्री, अवघ्या काही तासांत झाले 'इतके' फॉलोवर्स

सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान (Ibrahim Ali Khan) त्या स्टारकिड्स पैकी एक आहे जो पदार्पणाआधीच मीडियामध्ये चर्चेत असतो. त्याच्या गुड लूक्सवर तरुणी फिदा आहेत. सोशल मीडियावर मोस्ट हँडसम स्टारकिड म्हणून त्याची चर्चा असते. आता सैफ अली खान आणि अमृता सिंहच्या लाडका लेक इब्राहिम अली खाननेइन्स्टाग्रामवर धमाकेदार पदार्पण केलं आहे. त्याच्या इन्स्टाग्राम एन्ट्रीने चाहते जाम खूश झालेत. त्यामुळे सध्या तो चांगलाच चर्चेत आला आहे.

इब्राहिम अली खानने त्याचे काही नवाबी थाटातील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 'वारसा? मी स्वतः बनवीन. @pumaindia सोबत माझी पहिली वाटचाल सुरू करत आहे', असं त्यानं कॅप्शनमध्ये लिहिले आहे. इब्राहिम अली खानने पुमा इंडियाची जाहिरात केल्याचं दिसून येत आहे. इब्राहिम अली खान इन्स्टाग्रामवर येताच हजारो चाहत्यांनी त्याला फॉलो करायला सुरुवात केली आहे.  इतकंच नाही तर त्याची सावत्र आई अर्थात करिना कपूर खानने पहिली कमेंट करत त्याचं इन्स्टाग्रामवर स्वागत केलं आहे. तसंच इतर बॉलिवूड कलाकारांनी कमेंट करत त्याला वेलकम म्हटलं आहे.

इंस्टाग्राम हँडलवर डेब्यू करताच काही मिनिटांत त्याच्या पोस्टवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव झाला आहे. काही क्षणातच त्याचे फॉलोअर्सबद्दल बोललो तर ते देखील 576K हजार म्हणजे 5 लाख 76 हजारांपर्यंत वाढले आहे. तर इब्राहिमने फक्त 41 लोकांना फॉलो केलं आहे, ज्यात आलिया भट्ट, अमृता सिंग, सारा अली खान, सुहाना खान आणि पलक तिवारी यांचा समावेश आहे. 

इब्राहिम त्याच्या बॉलिवूडमधील डेब्यूसाठी सज्ज आहे. विशेष म्हणजे इब्राहिमचा डेब्यू सिनेमा 'सरजमीन' असणार आहे. धर्मा प्रोडक्शनच्या या सिनेमात काजोलसोबत त्याने स्क्रीन शेअर केली आहे. इब्राहिम खानने गेल्या वर्षी रिलीज झालेल्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' सिनेमासाठी असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केले होते. करण जोहरला असिस्ट करण्याची संधी त्याला यातून मिळाली होती.

माध्यम रिपोर्टनुसार, तो जान्हवी कपूरसोबत (Janhavi Kapoor) आगामी सिनेमात रोमान्स करताना दिसणार आहे. हा त्याच्या दुसरा सिनेमा असणार आहे. हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार, इब्राहिम आणि जान्हवीने नुकतीच एक रोमँटिक कॉमेडी फिल्म साईन केली आहे. या सिनेमात आणखी एक अभिनेत्री महिमा मकवानाही असणार आहे. त्यामुळे इब्राहिम एक नाही तर दोन अभिनेत्रींसोबत झळकणार आहे.  इब्राहिमनेही त्याच्या हँडसम लूकने चाहत्यांचं मन जिंकलंच आहे मात्र आता त्याच्या अभिनयाची परीक्षा असणार आहे. यात तो किती खरा उतरतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

Web Title: Ibrahim Ali Khan makes his Instagram debut first Instagram post is all about legacy See his Nawabi pictures

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.