'हाउसफुल्ल ५'च्या इव्हेंटमध्ये प्रचंड गर्दीत महिलांचा रडण्याचा आवाज, अक्षय कुमारचा संताप अनावर, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 10:50 IST2025-06-02T10:45:52+5:302025-06-02T10:50:19+5:30

Chaos Erupts At Housefull 5 Event: पुण्याच्या सीझन मॉलमध्ये 'हाउसफुल्ल ५'च्या इव्हेंटवेळी प्रचंड गर्दी झाल्याने चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली होती. शेवटी अक्षय कुमारने काय केलं बघा

huge crowd at season mall pune for see akshay kumar housefull 5 cast video viral | 'हाउसफुल्ल ५'च्या इव्हेंटमध्ये प्रचंड गर्दीत महिलांचा रडण्याचा आवाज, अक्षय कुमारचा संताप अनावर, व्हिडीओ व्हायरल

'हाउसफुल्ल ५'च्या इव्हेंटमध्ये प्रचंड गर्दीत महिलांचा रडण्याचा आवाज, अक्षय कुमारचा संताप अनावर, व्हिडीओ व्हायरल

'हाउसफुल्ल ५' सिनेमाची (housefull 5 movie) सर्वांना उत्सुकता आहे. हा सिनेमा काहीच दिवसांमध्ये रिलीज होणार आहे. 'हाउसफुल्ल ५'च्या प्रमोशनला सुरुवात झाली आहे. अशातच सिनेमाची संपूर्ण टीम पुण्यातील सीझन्स मॉलमध्ये प्रमोशनसाठी काल रविवारी १ जून रोजी गेली होती. परंतु या इव्हेंटला सर्व स्टारकास्टला पाहण्यासाठी लोकांची प्रचंड गर्दी झाली. यावेळी गर्दी इतकी प्रचंड वाढली की महिलांच्या रडण्याचा आवाज ऐकून अक्षय चांगलाच संतापला. काय घडलं बघा?

'हाउसफुल्ल ५'च्या इव्हेंटमध्ये काय घडलं

पुण्यातील सीझन्स मॉलमध्ये 'हाउसफुल्ल ५'च्या प्रमोशनचा कार्यक्रम सुरु होताच मॉलच्या सर्व मजल्यांवर आणि गॅलऱ्यांमध्ये लोकांनी कलाकारांना बघण्यासाठी प्रचंड गर्दी केली, ज्यामुळे चेंगराचेंगरीसारखी स्थिती निर्माण झाली. महिलांचा आणि लहान मुलांचा रडण्याचा आवाज ऐकू आला. त्यामुळे अक्षय कुमारने तत्काळ माईकवरून हात जोडून सर्व लोकांना शांत राहण्याचे आणि ढकलाढकली टाळण्याचे आवाहन केले. "हात जोडून विनंती करतो.. इथे महिला आणि मुले आहेत.. कृपया ढकलाढकली करू नका." अशाप्रकारे अक्षयचा राग अनावर होऊन त्याने सर्वांना शांत राहण्याचे आवाहन दिले.



या प्रचंड गर्दीत काही महिला आणि मुलं रडताना दिसली. एक लहान मुलीची तिच्या आई-बाबांपासून चुकामुक झाली. त्यावेळी जॅकलीन फर्नांडिस आणि सोनम बाजवा यांनी प्रसंगावधान राखत त्या मुलीला शांत केले आणि तिच्या पालकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. 'पुष्पा २'च्या प्रीमियरला चेंगराचेंगरी होऊन एका महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना यामुळे लोकांना आठवली.

'हाऊसफुल ५' हा सिनेमा ६ जून २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात अक्षय कुमार, अभिषेक बच्चन, रितेश देशमुख, जॅकलीन फर्नांडिस, सोनम बाजवा, नरगिस फाखरी, संजय दत्त, जॅकी श्रॉफ, नाना पाटेकर, चित्रांगदा सिंग, फरदीन खान, चंकी पांडे, जॉनी लिव्हर, श्रेयस तळपदे, डिनो मोरिया, रंजीत, सौंदर्या शर्मा, निकितिन धीर आणि आकाशदीप साबीर यांसारख्या कलाकारांचा समावेश आहे.

Web Title: huge crowd at season mall pune for see akshay kumar housefull 5 cast video viral