सैफ अली खान इतक्या लवकर कसा बरा झाला? सगळेच पडले संभ्रमात; बहीण सबाने दिलं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 12:06 IST2025-01-28T12:05:33+5:302025-01-28T12:06:07+5:30

पाठीच्या मणक्याची सर्जरी होऊनही सैफ इतक्या लवकर कसा बरा झाला असा प्रश्न सगळेच विचारत आहेत.

How did Saif Ali Khan recover so quickly sister saba pataudi gave clarification | सैफ अली खान इतक्या लवकर कसा बरा झाला? सगळेच पडले संभ्रमात; बहीण सबाने दिलं उत्तर

सैफ अली खान इतक्या लवकर कसा बरा झाला? सगळेच पडले संभ्रमात; बहीण सबाने दिलं उत्तर

अभिनेता सैफ अली खानवर (Saif Ali Khan) हल्ला झाल्याची घटना सर्वांना धक्का देऊन गेली. त्याच्याच घरात घुसलेल्या चोराने सैफवर हल्ला केला होता. यानंतर त्याला तातडीने लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर सर्जरीही झाली. सहा दिवसात त्याला डिस्चार्ज मिळाला. सैफ या हल्ल्यातून थोडक्यात बचावला होता. त्यामुळे त्याला चांगलाच मार लागला असणार असंच सगळ्यांना वाटत होतं. मात्र डिस्चार्ज मिळाल्यावर तो अगदी सामान्यासारखा पटापट चालताना दिसला. पाठीच्या मणक्याची सर्जरी होऊनही सैफ इतक्या लवकर कसा बरा झाला असा प्रश्न सगळेच विचारत आहेत. यावर आता त्याची बहीण सबा पतोडीने (Saba Pataudi) उत्तर दिलं आहे.

सबा पतोडीने इन्स्टाग्राम स्टोरीवर एका बातमीचा फोटो शेअर केला आहे. या बातमीत डॉक्टरांनी दिलेलं स्पष्टीकरण आहे. यासोबत सबाने लिहिले, 'संपूर्ण तथ्य जाणून घेण्यासाठी या बातमीवर क्लिक करा. यात डॉ दीपक कृष्णमूर्ती यांचं स्टेटमेंट आहे. मणक्याची सर्जरी झालेल्या ७८ वर्षीय वृद्ध महिलेचा व्हिडिओही यामध्ये पोस्ट करण्यात आला आहे. डॉक्टर म्हणतात, कार्डिएक बायपास सर्जरी केल्यानंतरही तिसऱ्या-चौथ्या दिवशीही लोक जिने चढतात. जरा स्वत: शिक्षित व्हा."

सैफच्या इतक्या पटकन बरं होण्यावर काही नेत्यांनीही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. अद्याप सैफकडून यावर काहीही स्पष्टीकरण आलेलं नाही. सध्या सैफ घराबाहेर पडतो आणि एकदम फिट अँड फाईन दिसतोय. मात्र त्याला काही महिने आरामाचा सल्ला दिला आहे. त्यामुळे त्याच्या आगामी सिनेमांच्या शूटिंगला ब्रेक लागला आहे. 

Web Title: How did Saif Ali Khan recover so quickly sister saba pataudi gave clarification

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.