युवराजच्या घरी लगीनघाई

By Admin | Updated: June 16, 2016 11:48 IST2016-06-16T11:48:42+5:302016-06-16T11:48:42+5:30

क्रिकेटर युवराज सिंग आणि अभिनेत्री हैजल किच यांच्या लग्नाची लगबग सुरू झाली आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत दोघेही लग्न करणार असल्याची चर्चा आहे

At the home of Yuvraj's house | युवराजच्या घरी लगीनघाई

युवराजच्या घरी लगीनघाई

>ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. 16 -  क्रिकेटर युवराज सिंग आणि अभिनेत्री हैजल किच यांच्या लग्नाची लगबग सुरू झाली आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत दोघेही लग्न करणार असल्याची चर्चा आहे. लग्नात आपण अतिशय सुंदर दिसावे अशी प्रत्येकच मुलीची इच्छा असते. त्यामुळे हैजलदेखील लग्नात अतिशय सुंदर दिसावे यासाठी आतापासूनच तयारीला लागली आहे.  हैजल लग्नात डिझायनर लेहेंगा घालणार आहे आणि यासाठी सध्या ती चांगल्या डिझायनरच्या शोधात आहे. तिने काही डिझायर्नसन्सची भेटदेखील घेतली आहे. या डिझायर्नरमधून सगळ्यात चांगल्या डिझायनरला ती आपल्या लग्नाचा पोशाख बनवण्याचे काम देणार आहे. हैजलची ही तयारी पाहाता काही महिन्यातच युवराज आणि हैजल लग्नबंधनात अडकणार आहेत यात काही शंकाच नाही. 
 

Web Title: At the home of Yuvraj's house