​‘पोस्टर ब्वॉईज’चा मजेशीर ट्रेलर तुम्ही पाहिलात का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2017 15:45 IST2017-07-24T10:13:30+5:302017-07-24T15:45:25+5:30

सनी देओल, बॉबी देओल, श्रेयस तळपदे स्टारर ‘पोस्टर ब्वॉईज’ या चित्रपटाची पहिली झलक आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. होय,‘पोस्टर ब्वॉईज’चे पहिले पोस्टर रिलीज झाले आहे. शिवाय या चित्रपटाचे ट्रेलरही आऊट झाले आहे.

Have you seen the poster boys' fun trailer? | ​‘पोस्टर ब्वॉईज’चा मजेशीर ट्रेलर तुम्ही पाहिलात का?

​‘पोस्टर ब्वॉईज’चा मजेशीर ट्रेलर तुम्ही पाहिलात का?

ी देओल, बॉबी देओल, श्रेयस तळपदे स्टारर ‘पोस्टर ब्वॉईज’ या चित्रपटाची पहिली झलक आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. होय,‘पोस्टर ब्वॉईज’चे पहिले पोस्टर रिलीज झाले आहे. शिवाय या चित्रपटाचे ट्रेलरही आऊट झाले आहे. या पोस्टरमध्ये सनी, बॉबी व श्रेयस कार्टून स्टाईलमध्ये दिसतो आहे. हे पोस्टर तुम्ही बारकाईने बघितल्यास यात, एक गोष्ट तुम्ही नोट कराल. ती म्हणजे, यात बॉबी, सनी व श्रेयस तिघेही आपली बॉडी दाखवताना दिसत आहेत. ‘हमने नसबंदी करवा ली, आप भी करवा लो,’ असे या पोस्टरवर लिहिले आहे. एकंदर काय तर पोस्टर बरेच मजेशीर आहे. ट्रेलर म्हणाल तर तो पोस्टरपेक्षाही मजेशीर आहे. यात सनी, बॉबी व श्रेयसचे एक वेगळेच रूप तुम्हाला बघायला मिळेल. तेव्हा पाहा, तर आणि आम्हाला कळवा, चित्रपटाचा ट्रेलर कसा वाटला ते.



‘पोस्टर ब्वॉईज’ हा चित्रपट श्रेयसच्या याच नावाच्या मराठी चित्रपटाचा रिमेक आहे. मराठीत हा चित्रपट लोकांना चांगलाच भावला होता आणि सुपरहिट ठरला होता.  आता हाच चित्रपट हिंदीत येतो आहे. निश्चितपणे या चित्रपटात भरपूर कॉमेडी असणार, हे सांगणे नकोच. चित्रपटातील कथा तीन पात्रांभोवती फिरणारी आहे. हा चित्रपट तीन हमालांची रिअल लाईफ स्टोरी असल्याचे म्हटले जाते. विशेष म्हणजे, या चित्रपटाद्वारे श्रेयस दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पाऊल ठेवतो आहे. सप्टेंबरमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. ‘यमला पगला दीवाना2’नंतर सनी देओल आणि बॉबी देओल ही दोन भावांची जोडी, पुन्हा एकदा या चित्रपटात एकत्र दिसणार आहे. 

Web Title: Have you seen the poster boys' fun trailer?