घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान लेकाच्या बर्थडे पार्टीतून गोविंदा गायब, आईसोबत साजरा केला वाढदिवस
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2025 11:09 IST2025-03-02T11:08:15+5:302025-03-02T11:09:29+5:30
गोविंदा घटस्फोटाच्या चर्चांवर अद्याप शांत

घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान लेकाच्या बर्थडे पार्टीतून गोविंदा गायब, आईसोबत साजरा केला वाढदिवस
अभिनेता गोविंदा (Govinda) आणि पत्नी सुनिता आहुजा (Sunita Ahuja) यांच्या घटस्फोटाची काही दिवसांपूर्वी चर्चा झाली. नंतर सुनिताने सहा महिन्यांपूर्वीच गोविंदालाघटस्फोटाची नोटीस पाठवली होती असा खुलासा झाला. तसंच दोघंही वेगवेगळ्या घरात राहतात असं सुनिता स्वत:च म्हणाली होती. आता नुकतंच गोविंदाचा लेक यशवर्धनने वाढदिवस साजरा केला. लेकाच्या वाढदिवसाला त्याची आई आणि बहीण होते मात्र गोविंदा दिसला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा गोविंदाचं पत्नीसोबत बिनसल्याची चर्चा सुरु झाली आहे.
गोविंदा आणि सुनिता आहुजाचा मुलगा यशवर्धनने १ मार्च रोजी आपला २८ वा वाढदिवस साजरा केला. त्याच्या वाढदिवसाची जंगी पार्टीही आयोजित करण्यात आली होती. जवळचे मित्र परिवार सहभागी झाले. रवीना टंडनची लेक राशा थडानीही यावेळी दिसली. यशवर्धनने आई सुनिता आणि बहीण टीनासोबत केक कट केला. यावेळी वडील गोविंदा मात्र कुठेच दिसले नाहीत. यावरुन नेटकऱ्यांनी चर्चा सुरु केली. लेकाच्या वाढदिवसाला गोविंदा गायब अशी चर्चा सुरु झाली.
तर दुसरीकडे घटस्फोटाच्या चर्चा आणि वेगळं राहण्यावर नुकतंच सुनिता आहुजाने मौन सोडत सांगितलं की, "गोविंदाने राजकारणात प्रवेश केला तेव्हा बरेच नेतेमंडळी घरी यायचे. तेव्हा घरात मी आणि टीना शॉर्ट्समध्ये असायचो. त्यांच्यासमोर असं फिरणं चांगलं वाटत नव्हतं म्हणून आम्ही वेगळा फ्लॅट घेतला. जेणेकरुन गोविंदाला तिथे त्याच्या मीटिंग्स करता येतील. मला आणि गोविंदाला कोणी वेगळं करेल अशी कोणाचीही हिंमत नाही. कोणामध्ये हिंमत असेल तर समोर या."
गोविंदा आणि सुनिता आहुजा ३७ वर्षांपासून संसार करत आहेत. त्यांची जोडी सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे. सुनिताने काही मुलाखतींमध्ये गोविंदाच्या अफेअर्सबाबतीत बरंच काही सांगितल्याने त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं होतं.