२०२५ मध्ये भारतात गुगलवर सर्वाधिक सर्च केलेला चित्रपट कोणता? नाव वाचून थक्क व्हाल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 13:30 IST2025-12-11T13:29:37+5:302025-12-11T13:30:43+5:30
२०२५ मध्ये गुगलवर सर्वाधिक सर्च झालेला 'हा' ब्लॉकबस्टर चित्रपट, घरबसल्या पाहू शकता!

२०२५ मध्ये भारतात गुगलवर सर्वाधिक सर्च केलेला चित्रपट कोणता? नाव वाचून थक्क व्हाल!
गुगलने २०२५ सालचा टॉप सर्च रिझल्ट रिपोर्ट जाहीर केला आहे. या यादीमध्ये भारतीयांनी २०२५ मध्ये सर्वात जास्त कोणत्या गोष्टी सर्च केल्या आहेत? गुगलने क्रीडा, मनोरंजन, राजकारण, खाद्य पदार्थ अशा अनेक श्रेणींमध्ये गुगलची टॉप सर्च लिस्ट जाहीर केली आहे. २०२५ या वर्षात गुगलवर सर्वाधिक सर्च केलेला चित्रपट कोणता, हेदेखील उघड झाले आहे.
दोन नवोदित कलाकारांचा हा रोमँटिक ड्रामा प्रदर्शित झाल्यानंतर अक्षरशः बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला होता. बॉक्स ऑफिसवर प्रचंड यश मिळवलेल्या आणि कमाईचे अनेक रेकॉर्ड तोडणाऱ्या, 'सैयारा' या रोमँटिक ड्रामा चित्रपटाने गुगल सर्चमध्ये भारतात अव्वल स्थान पटकावले आहे.
'सैयारा' हा २०२५ मध्ये सर्वाधिक सर्च केलेला चित्रपट ठरेल, अशी कोणालाही अपेक्षा नव्हती. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे या चित्रपटात अनित पड्डा आणि अहान पांडे या दोन नवोदित कलाकारांनी पदार्पण केलं होतं. 'सैयारा' पाहिल्यानंतर लोकांचे रडतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, ज्यामुळे या चित्रपटाबद्दल प्रचंड चर्चा झाली होती.
मोहित सुरी दिग्दर्शित या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कलेक्शन केले आणि अनेक रेकॉर्ड मोडले. 'बॉलिवूड हंगामा'नुसार, 'सैयारा'ने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर ३३७ कोटींपेक्षा जास्त कमाई केली. तर जगभरात ५७९.२३ कोटींचा गल्ला जमवला होता. जर तुम्ही अद्याप हा चित्रपट पाहिला नसेल तर आता तो तुम्ही घरबसल्या पाहू शकता. अडीच तासांचा हा रोमँटिक ड्रामा चित्रपट सध्या ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे.