"लग्नानंतर मला सिनेमात..."; जिनिलिया देशमुखने इतक्या वर्षांनी मनातली खंत केली व्यक्त, म्हणाली-

By देवेंद्र जाधव | Updated: June 11, 2025 09:37 IST2025-06-11T09:35:37+5:302025-06-11T09:37:03+5:30

महाराष्ट्राची लाडकी वहिनी जिनिलिया देशमुखने सितारे जमीन पर सिनेमानिमित्त तिच्या मनातील इतक्या वर्षांची खंत व्यक्त केली आहे. काय म्हणाली जिनिलीया?

genelia deshmukh talk about bollywood mentality After marriage with riteish deshmukh | "लग्नानंतर मला सिनेमात..."; जिनिलिया देशमुखने इतक्या वर्षांनी मनातली खंत केली व्यक्त, म्हणाली-

"लग्नानंतर मला सिनेमात..."; जिनिलिया देशमुखने इतक्या वर्षांनी मनातली खंत केली व्यक्त, म्हणाली-

बॉलिवूडमध्ये सध्या एका सिनेमाची चर्चा आहे. हा सिनेमा म्हणजे 'सितारे जमीन पर'. आमिर खान (aamir khan) या सिनेमात प्रमुख भूमिकेत आहे. या सिनेमाच्या निमित्ताने आमिर खान आणि जिनिलिया देशमुख (genelia deshmukh) पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करणार आहेत. जिनिलियाने आमिरच्या मैत्रिणीची भूमिका केलेली दिसतेय. या सिनेमाच्या प्रमोशननिमित्त जिनिलियाने तिच्या मनातील खंत व्यक्त केली. लग्न झाल्यावर बॉलिवूडने साइडलाइन केलं, अशी खंत जिनिलीयाने व्यक्त केली.

जिनिलीयाने मनातली खंत केली व्यक्त

फिल्मी मंत्र मीडियाला दिलेल्या मुलाखतीत जिनिलिया म्हणाली, "जेव्हा लोकांना कळालं की, मी सितारे जमीन परमध्ये काम करतेय तेव्हा मी किती नशीबवान आहे, आमिरसोबत सिनेमा करतेय, असं सर्वजण म्हणाले. खरंच आमिर खान सरांचा हा मोठेपणा आहे आणि त्यांनी माझ्यात काहीतरी पाहिलं. त्यांनी माझं ऑडिशन घेतलं. परंतु तुम्हीही माझ्यासोबत असंच काही करु शकता? मला एखादी भूमिका देऊ शकता. पण तुम्ही तुमच्या मनात एक मर्यादा आखल्या आहेत. कदाचित माझं लग्न झाल्यामुळे मला अशा भूमिकांची गरज नाही, असं तुम्हाला वाटत असावं. फिल्म मेकिंग बदलली असल्याने आपल्या मानसिकतेमध्येही बदल करण्याची गरज आहे."

जिनिलिया पुढे म्हणाली, "एखाद्या भूमिकेचं वय बघता आपण त्याच वयातील एखाद्या कलाकाराला कास्ट केलं पाहिजे. भूमिकेचं वय जास्त असेल आणि तुम्ही एखाद्या लहान अभिनेत्याला कास्ट केलं तर त्या भूमिकेच्या बारीक पैलूंना ती व्यक्ती समजू शकत नाही. त्यामुळे योग्य भूमिका आणि कलाकार निवडणं गरजेचं आहे. सर्वांना संधी मिळेल, अशी मला आशा आहे, अशा शब्दात जिनिलीयाने तिचं मत व्यक्त केलंय."


जिनिलीयाच्या वयाच्या अंतरावर आमिर काय म्हणाला होता?

इंडियन एक्सप्रेसशी बोलताना जिनिलियासोबतच्या २३ वर्षांच्या वयाच्या अंतराबद्दल आमिर खान म्हणाला,"मला माहित होते की माझ्या आणि जिनिलियाच्या वयाबद्दल नक्कीच प्रश्न उपस्थित होतील. बराच काळ लोटला आहे आणि आता इम्रान खानही माझ्यापेक्षा खूप मोठा झाला आहे. आता आपल्याकडे व्हीएफएक्स आहेत. पुर्वी असं होतं की जर मला १८ वर्षांच्या मुलाची भूमिका करायची असेल तर मला प्रोस्थेटिक्सचा वापर करावा लागायचा."

"जसं प्रोस्थेटिक्सचा वापर करुन अनिल कपूरनं 'ईश्वर' (१९८९) या चित्रपटात ८० वर्षांच्या वृद्धाची भूमिका केली होती. पण, आता व्हीएफएक्सच्या मदतीने तुम्ही पडद्यावर सहजपणे ८०, ४० किंवा २० वर्षांचे दिसू शकता. आता वय कलाकारांसाठी अडथळा नाही". आमिर - जिनिलियाचा 'सितारे जमीन पर' सिनेमा २० जूनला रिलीज होणार आहे.

Web Title: genelia deshmukh talk about bollywood mentality After marriage with riteish deshmukh