"नवऱ्यासोबत आजपर्यंत काम केलं नाही कारण..." गीतांजली कुलकर्णीने केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2023 16:09 IST2023-05-02T16:07:22+5:302023-05-02T16:09:37+5:30
एनएसडीमध्ये शिकत असताना अतुल कुलकर्णी हे गीतांजलीचे सिनिअर होते.

"नवऱ्यासोबत आजपर्यंत काम केलं नाही कारण..." गीतांजली कुलकर्णीने केला खुलासा
मराठीसह हिंदी सिनेमात आपल्या दमदार अभिनयाने रसिकांची मनं जिंकणाऱ्या अतुल कुलकर्णी (Atul Kulkarni) यांनी अभिनेत्री गीतांजलीसह (Geetanjali Kulkarni) लग्न केलं. या दोघांच्या प्रेमाची गोष्टही तितकीच हटके आहे. १९९३ साली एनएसडीमध्ये अतुल आणि गीतांजली यांची भेट झाली. हळूहळू दोघांमध्ये मैत्री झाली आणि त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. २९ डिसेंबर १९९६ रोजी पुण्यात दोघं रेशीमगाठीत अडकले. मात्र इतक्या वर्षात दोघांनी एकत्र काम केलेलं नाही.
एनएसडीमध्ये शिकत असताना अतुल कुलकर्णी हे गीतांजलीचे सिनिअर होते. गीतांजलीने नेहमी त्यांच्याकडे गुरु म्हणून पाहिले ती त्यांच्याकडून खूप काही शिकली. मात्र अतुलसोबत कधीही काम न करणाऱ्यावर गीतांजली एका मुलाखतीत म्हणाल्या होत्या की, "दोघांची वेगवेगळी ओळख आहे कामाची पद्धत वेगळी आहे. तसंच तो बऱ्यापैकी डॉमिनेटिंगही आहे. काम करताना दबाव नको असतो. सतत रागवणं, चुका सांगणं असं नको म्हणून आम्ही आजपर्यंत सोबत काम केलं नाही."
'गुल्लक' या सिरीजमधील भूमिकेसाठी गीतांजली कुलकर्णी यांचं सध्या खूप कौतुक होत आहे. तर 'हॅपी फॅमिली' सिरीजमधून अभिनेते अतुल कुलकर्णी सुद्धा ओटीटीवर प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत.