'तारा सिंग'च्या डोळ्यात तरळले अश्रू, 'सकीना'नं असा दिला सहारा; सनी देओलचा Emotional व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2023 12:52 PM2023-07-27T12:52:40+5:302023-07-27T13:00:51+5:30

Sunny Deol Emotional: 26 जुलैला मुंबईत चित्रपटाचे ट्रेलर लॉन्च झाले. यावेळी सनी देओलच्या भावनांचा बांध तुटला आणि डोळ्यात अश्र तरळले. यावेळी त्यांनी सर्व चाहत्यांचे आभार मानले. त्याचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे...

gadar 2 Tara Singh had tears in his eyes, Sakina gave support Sunny Deol's emotional video goes viral | 'तारा सिंग'च्या डोळ्यात तरळले अश्रू, 'सकीना'नं असा दिला सहारा; सनी देओलचा Emotional व्हिडिओ व्हायरल

'तारा सिंग'च्या डोळ्यात तरळले अश्रू, 'सकीना'नं असा दिला सहारा; सनी देओलचा Emotional व्हिडिओ व्हायरल

googlenewsNext

सध्या सनी देओल आणि अमीषा पटेल जबरदस्त चर्चेत आहेत. त्यांचा 'गदर 2' चित्रपट रिलीज होण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. 26 जुलैला मुंबईत चित्रपटाचे ट्रेलर लॉन्च झाले. यावेळी सनी देओलच्या भावनांचा बांध तुटला आणि डोळ्यात अश्र तरळले. यावेळी त्यांनी सर्व चाहत्यांचे आभार मानले. त्याचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि चाहतेही आपण नेहमीच आपल्या फेव्हरिट अॅक्टरसोबत आहोत असे म्हणत आहेत.

खरे तर Gadar 2 च्या ट्रेलरला चाहत्यांचा मिळत असलेला रिस्पॉन्स पाहून सनी देओल भावूक झाला. त्याच्या डोळ्यातून पाणी आले. तो म्हणाला, असे वाट होते की, मुंबईत पाऊस सुरू आहे. पण येथे तर काना कोपऱ्यातून चाहते आले आहेत. हे पाहून तो भावूक झाला. 'तारा सिंग'च्याच्या डोळ्यात पाणी आले तेवढ्यात, 'सकीना' (अमीषा पटेल) त्याला सहारा देताना दिसली.

11 ऑगस्टला रिलीज होतोय 'गदर 2' -
सनी देओल, अमीषा पटेल, उत्कर्ष शर्मा आणि सिमरत कौर स्टारर 'गदर 2' 11 ऑगस्ट 2023 रोजी थिएटर्समध्ये प्रदेर्शित होईल. हा मुव्ही 'गदर'चा सिक्वल आहे. जो 2001 मध्ये रिलीज झाला होता. हे दोन्ही चित्रपट अनिल शर्मा दिग्दर्शित आहेत.

पाहा 'गदर 2' चा ट्रेलर -

Web Title: gadar 2 Tara Singh had tears in his eyes, Sakina gave support Sunny Deol's emotional video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.