...अन् ‘गदर २’मधील ‘तो’ सीन पाहून थिएटरमध्येच ओरडू लागला कार्तिक आर्यन, पाहा व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2023 04:45 PM2023-08-17T16:45:46+5:302023-08-17T16:46:52+5:30

Video : कार्तिक आर्यनने शेअर केला 'गदर २' पाहतानाचा व्हिडिओ, म्हणाला, "मी थिएटरमध्ये..."

gadar 2 kartik aryan start screaming in theatres while watching sunny deol movie shared video | ...अन् ‘गदर २’मधील ‘तो’ सीन पाहून थिएटरमध्येच ओरडू लागला कार्तिक आर्यन, पाहा व्हिडिओ

...अन् ‘गदर २’मधील ‘तो’ सीन पाहून थिएटरमध्येच ओरडू लागला कार्तिक आर्यन, पाहा व्हिडिओ

googlenewsNext

सनी देओलच्या ‘गदर २’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. २००१ साली गदर चित्रपटाने प्रेक्षकांना भुरळ घातली होती. आता २२ वर्षांनंतर या चित्रपटाचा सीक्वेल असलेला ‘गदर २’ प्रेक्षकांना चित्रपटगृहापर्यंत खेचून आणण्यात आणि त्यांना खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरत आहे. ‘गदर २’ चित्रपटाची सर्वत्र हवा असताना बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनलाही हा चित्रपट पाहण्याचा मोह आवरता आला नाही.

कार्तिकने सिनेमागृहांत जाऊन ‘गदर २’ सिनेमा पाहिला. हा सिनेमा पाहिल्यानंतर त्याने सोशल मीडियावरुन त्याचा अनुभव शेअर केला आहे. ‘गदर’ चित्रपटातील गाण्यांप्रमाणे सनी देओल हँडपंप उचलतो तो सीन लोकप्रिय ठरला होता. ‘गदर २’मध्ये अशा प्रकारचा सीन चित्रीत करण्यात आला आहे. कार्तिक आर्यनने थिएटरमध्ये चित्रपट बघत असताना या सीनचा व्हिडिओ त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये कार्तिक हा सीन सुरू असताना ओरडत असल्याचंही पाहायला मिळत आहे.

‘व्हॉट झुमका’ गाण्याच्या संगीतकारांना आशा भोसलेंनी सुनावलं, म्हणाल्या, “जुन्या गाण्यांचे रिमेक...”

“पावनखिंड, फर्जंद पाहून गुन्हेगार सुधारले”, दिग्पाल लांजेकरांनी सांगितला अनुभव, म्हणाले, “ठाण्याच्या कारागृहात...”

“हा आयकॉनिक सीन...माझ्यातलं खोडकर मुल तारा सिंहसाठी ओरडत आहे,” असं कॅप्शन त्याने या पोस्टला दिलं आहे. त्याच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनीही कमेंट केल्या आहेत. दरम्यान सनी देओलचा ‘गदर २’ने पहिल्या दिवसापासूनच बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाईला सुरुवात केली. या चित्रपटाने सहा दिवसांत २६८ कोटींचा गल्ला जमवला आहे. या चित्रपटात सनी देओल, अमीषा पटेल, उत्कर्ष शर्मा यांच्या मुख्य भूमिका आहेत.

Web Title: gadar 2 kartik aryan start screaming in theatres while watching sunny deol movie shared video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.