Video: प्रसिद्ध गायक शानच्या मुंबईतील इमारतीला आग, अग्निशमन दलाने मिळवलं नियंत्रण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 09:22 IST2024-12-24T09:22:19+5:302024-12-24T09:22:42+5:30
शान आणि त्याचं कुटुंबही घरातच होतं. रहिवाश्यांसोबत शान आपल्या पत्नी आणि मुलांसह घराखाली आला.

Video: प्रसिद्ध गायक शानच्या मुंबईतील इमारतीला आग, अग्निशमन दलाने मिळवलं नियंत्रण
लोकप्रिय गायक शानच्या (Shaan) मुंबईतील इमारतीत आग लागली. आज मंगळवार (२४ डिसेंबर) पहाटेच ही लागली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आग भडकण्याआधीच सर्व रहिवासी इमारतीखाली येऊन थांबले. माहितीनुसार, शान आणि त्याचं कुटुंबही घरातच होतं. रहिवाश्यांसोबत शान आपल्या पत्नी आणि मुलांसह घराखाली आला. या आगीत एक वृद्ध महिला गंभीर आहे.
बांद्रा पश्चिम येथील फॉर्च्युन एन्क्लेव्ह इमारतीतील आठव्या मजल्यावर आज पहाटेच आग लागली. तर गायक शानचं घर ११व्या मजल्यावर आहे. अग्निमशन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झालं आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. विद्युत शॉर्टसर्किट झाल्यामुळे आग लागल्याचं प्राथमिक कारण सांगण्यात आलं. घटनास्थळाचा व्हिडिओ 'एएनआय'ने ट्वीट केला आहे.
#WATCH | Mumbai, Maharashtra: Fire broke out in singer Shaan's residential building. Fire tenders on the spot. Further details awaited. pic.twitter.com/qWsmCggrf8
— ANI (@ANI) December 23, 2024