ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 13:52 IST2025-08-05T13:51:56+5:302025-08-05T13:52:33+5:30
१९६२ साली रेझांग ला येथे भारत विरुद्ध चीन युद्धावर सिनेमा आधारित आहे.

ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
फरहान अख्तरचा (Farhan Akhtar) बहुप्रतिक्षित '१२० बहादुर' (120 Bahadur) सिनेमाचा टीझर रिलीज झाला आहे. फरहान अख्तर यामध्ये मेजर शैतान सिंह भाटी यांच्या भूमिकेत आहे. १९६२ साली रेझांग ला येथे भारत विरुद्ध चीन युद्धावर सिनेमा आधारित आहे. या युद्धात केवळ १२० भारतीय सैनिक ३००० पेक्षा जास्त असलेल्या चीनच्या सैनिकांशी लढले होते. मेजर शैतान सिंह यांनीच या युद्धाचं नेतृत्व केलं होतं. याच युद्धावर आधारित '१२० बहादुर' सिनेमाचा अंगावर शहारे आणणारा टीझर प्रदर्शित झाला आहे.
चित्रपट १९६२ मधील रेझांग ला येथील खऱ्या युद्धावर आधारित आहे, जिथे फक्त १२० भारतीय जवानांनी हजारो शत्रूंचा मुकाबला करत इतिहास रचला. टीझरमध्ये सतत ऐकू येणारी एक प्रभावी ओळ, “आम्ही मागे हटणार नाही!” ही चित्रपटाच्या मूळ आत्म्याचे दर्शन घडवते. फरहान अख्तरचा गंभीर, समंजस आणि हृदयस्पर्शी अभिनय मेजर शैतान सिंह यांच्या रूपात विशेष लक्षवेधी ठरत आहे. त्याच्या अभिनयातील शांत, स्ट्राँग आणि वास्तवदर्शी शैलीला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून भरभरून दाद मिळत आहे. सिनेमा मराठी अभिनेते अजिंक्य देव यांचीही भूमिका आहे.
सिनेमाचं चित्रीकरण लडाख, राजस्थान आणि मुंबईत झालं आहे. हा चित्रपट युद्धभूमीची थरारक अनुभूती देतो. बर्फाच्छादित प्रदेशांपासून रणभूमीच्या शांततेपर्यंत प्रत्येक फ्रेममध्ये सखोलता आणि वास्तविकता दिसते. चित्रपटाचे दिग्दर्शन राजनीश ‘रेझी’ घोष यांनी केले असून, रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर (एक्सेल एंटरटेन्मेंट) तसेच अमित चंद्रा (ट्रिगर हॅपी स्टुडिओज) यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. ‘१२० बहादुर’ २१ नोव्हेंबर २०२५ रोजी सर्वत्र चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.